शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्यावर सीसी कॅमेराद्वारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 19:08 IST

corona virus Police Kolhapur- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील रस्ते निर्मनुष्य राहिले. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहिला. शहरातील प्रमुख चौकातील परिस्थितीवर पोलिसांनी मुख्यालयातील सीसी टीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला. रस्त्यावर नागरिक एकत्रित दिसताच मुख्यालयातून वायरलेसवरून सूचना देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले.

ठळक मुद्देशहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तविनाकारण फिरणाऱ्यावर सीसी कॅमेराद्वारे नजर

कोल्हापूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद लाभला. शहरातील रस्ते निर्मनुष्य राहिले. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहिला. शहरातील प्रमुख चौकातील परिस्थितीवर पोलिसांनी मुख्यालयातील सीसी टीव्ही कॅमेराद्वारे वॉच ठेवला. रस्त्यावर नागरिक एकत्रित दिसताच मुख्यालयातून वायरलेसवरून सूचना देऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवले.कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी ब्रेक द चेनसाठी प्रशासनाने शनिवारी व रविवारी वीकेड लॉकडाऊन केले. शहराच्या चौका-चौकात पोलीस, होमगार्ड तसेच वाहतूक पोलिसांनी खडा पहारा दिला. शहरात प्रवेशणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची विचारपूस करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता. विनाकारण फिरणाऱ्याच्या दुचाकी जप्त केल्या. त्यामुळे रस्ते, चौक सुनसान होते. फक्त अत्यावश्यक कारणांसाठी काहीजण वाहनावरून फिरताना दिसत होते. तेही पोलिसांचा नजरेतून सुटत नव्हते.दिवसभर तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरुजी वसाहत, आर.के.नगर या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, राजारामपुरीचे पो.नि. सीताराम डुबल, शाहुपुरीचे पो.नि. श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी तसेच काही पोलिसांनी संपूर्ण शहरातून वाहनांचे संचालन केले. यावेळी कोपऱ्यावर नाहक उभारलेल्या नागरिरकांना ध्वनिक्षेपावरून कारवाईच्या सूचना केल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर