शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

कोल्हापूर : अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवर पकडला. कारवाईत संदीप गोविंद ...

कोल्हापूर : अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवर पकडला. कारवाईत संदीप गोविंद सुतार (वय ३३, रा. आयोध्या काॅलनी, बोंद्रेनगर, रिंगरोड, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केलेल्या कारवाईत पावणेदोन लाखांचा गुटखा, टेम्पो असा सुमारे ५ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यातून अवैध व्यवसायांवर कारवाई करत समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. नि. प्रमोद जाधव यांनी शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध व्यवसायाच्या अनुषंगाने माहिती काढून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्या. कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवरून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकास मिळाली. त्यानुसार बुधवारी परिसरात सापळा रचून एक संशयास्पद टेम्पो पकडला. टेम्पोची तपासणी केली असता, त्यातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार टेम्पोतील पानमसाला, तंबाखू मसाला असा १ लाख ६३ हजार ५२० रुपये किमतीचा गुटखा तसेच टेम्पो असा सुमारे ५ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. टेम्पोचालक संदीप सुतार यालाही अटक केली. कारवाईनंतर संशयित आरोपीस मुद्देमालासह कागल पोलिसांच्या हवाली केले.

फोटो नं. ०१०९२०२१-कोल-गुटखा०१

ओळ : कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवर पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. टेम्पोचालकाला अटक करून सुमारे पावणेदोन लाखांचा गुटखा व टेम्पो जप्त केला.

010921\01kol_38_01092021_5.jpg

ओळ : कागल पंचतारांकित एमआयडीसी रोडवर पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा टेंम्पो पकडला. टेंम्पोचालकाला अटक करुन सुमारे पावणेदोन लाखाचा गुटखा व टेंम्पो जप्त केला.