शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषसुक्तातून जातीव्यवस्थेचे समर्थन

By admin | Updated: July 13, 2014 00:47 IST

बाबा आढाव यांचे मत : आंतरधर्मिय विवाहितांचा मेळावा

कोल्हापूर : जातीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, मात्र गेली शतकानुशतके ही जात भारताच्या मानगुटीवर बसली आहे. पुरुषसुक्तसारख्या धार्मिक ग्रंथात अशा जातीव्यवस्थेचे बेमालुमपणे समर्थन केले जाते. दुसरीकडे शालेय शिक्षणात सर्वधर्मसमभाव शिकवला जातो पण धर्माची चिकित्सा कुणी करायची नाही, हा अलिखित नियम. अशा विसंगत परिस्थितीतून आणि जातींच्या बंधनातून बाहेर पडल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले. आंतरजातीय आंतरधर्मिय विवाह सहायता केंद्राच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे आयोजित आंतरधर्मिय विवाहितांच्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश जाधव होते. व्यासपीठावर मेघा पानसरे, सीमा पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर उपस्थित होते. आढाव म्हणाले, राज्यघटनेने सर्वांना आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी झुंडशाहीने ते दडपले जाते. आज आंतरधर्मिय विवाह जुळवण्याचा पुरोगामी संस्था पुरस्कृत करत असल्या तरी अशा विवाहांना एवढा विरोध का, हा खरा प्रश्न आहे. पदोपदी शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा जयजयकार आणि त्यांच्या नावाने जातीचे राजकारण करणारी माणसं या महापुरुषांचा धर्मनिरपेक्षतावाद जाणीवपूर्वक लपवून ठेवतात. शाळेत धर्मनिरपेक्षता शिकवली जाते पण जातीव्यवस्थेची चिकित्सा करू दिली जात नाही.रमेश जाधव म्हणाले, आंतरजातीय-आंतरधर्मिय विवाह हे जातीअंतासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या संस्थांनी हे कार्य सातत्याने सुरू ठेवले पाहिजे. प्रास्ताविक मेघा पानसरे यांनी केले. यावेळी आरती पाटील, काशीनाथ सुतार, सेवानिवृत्त परिवहन अधिकारी पी. पी. मट्टेवार यांनी मनोगत व्यक्त केले. गोविंद पानसरे, उमा पानसरे, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, के. डी. खुर्द उपस्थित होते. सीमा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कृष्णात कोरे यांनी सूत्रसंचालन केले.