Kolhapur: कोगनोळी टोल नाक्यावर मालवाहू ट्रकला आग, टायर फुटल्याने घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:03 IST2025-05-22T15:02:57+5:302025-05-22T15:03:18+5:30
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने पूर्ण ट्रकला आग लागल्याची घटना कोगनोळी टोल नाका या ठिकाणी ...

Kolhapur: कोगनोळी टोल नाक्यावर मालवाहू ट्रकला आग, टायर फुटल्याने घडली घटना
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने पूर्ण ट्रकला आग लागल्याची घटना कोगनोळी टोल नाका या ठिकाणी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकहून महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रकचा कोगनोळी टोलनाका या ठिकाणी पुढील टायर फुटला. यामुळे ट्रकची बॉडी महामार्गावर आढळल्याने डिझेलची टाकी फुटली व ट्रकची बॉडी व महामार्गात घर्षण झाल्याने ट्रकने मोठा पेट घेतला. कोगनोळी टोल नाका या ठिकाणी टोलबूथवर अनेक वाहनांची व कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. अशातच हा अपघात घडल्याने सर्वांची मोठी धावपळ उडाली.
टोल बूथ वरील दिवे बंद करून काही काळ टोल नाका बंद ठेवण्यात आला. जवळपास १५ ते २० मिनिटे वाहने तशीच सोडण्यात आली. ट्रकला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमध्ये टोल वरील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.