शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कार दारातच, तरीही FasTag मधून पैसे कापले; वाहनधारकाची ऑनलाइन तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:26 IST

कारची चोरी झाल्याचा संशय आल्याने बाहेर जाऊन कार असल्याची खात्री केली. कार जागेवरच आहे, मग आपल्या खात्यातून टोलची रक्कम कशी काय गेली? असा प्रश्न त्यांना पडला.

कोल्हापूर : रामानंदनगर येथील रहिवासी शिवाजी विनायक चव्हाण यांची कार दारात उभी असतानाच त्यांच्या मोबाइलवर फास्टॅगची रक्कम वजा झाल्याचा मेसेज आला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर टोल नाक्यावरून टोलचे ४५ रुपये वजा होताच चव्हाण चक्रावले. अनेकांना असेच अनुभव येत असल्याने फास्टॅग यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

फास्टॅग यंत्रणेने टोल भरण्याची यंत्रणा गतिमान व पारदर्शक केल्याचा दावा रस्ते निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सरकारकडून केला जातो. मात्र, यात अजूनही अनेक त्रुटी आहेत. रामानंदनगर येथील शिवाजी चव्हाण यांची (एमएच ०२ सीपी ४९३२) ही कार शुक्रवारी दारात उभी होती. शनिवारी पहाटे त्यांच्या मोबाइलवर टोलचे ४५ रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. सकाळी उठल्यानंतर मेसेज पाहताच ते चक्रावले. 

कारची चोरी झाल्याचा संशय आल्याने बाहेर जाऊन कार असल्याची खात्री केली. कार जागेवरच आहे, मग आपल्या खात्यातून टोलची रक्कम कशी काय गेली? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी ऑनलाइन तकार केली आहे. दरम्यान, कार दारातच उभी असताना नाशिक टोल नाक्यावर दुसऱ्याच कारच्या फास्टॅगवर त्यांच्या कारचे तपशील कसे काय गेले? असा प्रश्न त्यांना पडला  आहे.

कार नंबर, फास्टॅग जुळले कसे?फास्टॅग रजिस्ट्रेशन करताना कारचा नंबर आणि संबंधित कार मालकाच्या बँक खात्याचे तपशील जोडले जातात. फास्टॅगचा बारकोड, कारचा नंबर आणि मालकाचे बँक खाते एवढे तपशील जुळले तरच टोलची रक्कम कपात करून घेतली जाते.

अचानक रक्कम कपात होण्याचे प्रकार...फास्टॅग अकाऊंटवर किमान ५०० रुपयांची रक्कम शिल्लक ठेवा, असे मेसेज बँकांकडून येतात. मात्र, जास्त रक्कम असल्यास ती अचानक कपात होण्याचेही प्रकार घडले आहेत. कपात झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी ऑनलाइन तक्रार करावी लागते. त्यानंतरही पूर्ण रक्कम मिळत नसल्याचे वाहनधारक सांगतात. त्यामुळे फास्टॅगबद्दलची विश्वासार्हता कमी होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Fastagफास्टॅगkolhapurकोल्हापूर