शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
6
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
7
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
8
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
9
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
10
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
11
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
12
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
14
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
15
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
16
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
17
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
18
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
19
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले

कोल्हापूर उत्तरचे ‘उत्तर’ मिळेना; उमेदवारीची उत्कंठा शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 12:58 IST

उत्तरची जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची घोषणा अजून बाकी असल्याने याविषयीचे औत्सुक्य वाढले आहे. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी आपल्या उमेदवारीला कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. ते मुंबईतच असून गुरुवारी कोल्हापुरात येणार आहेत.महायुतीच्या उमेदवारीसाठी भाजपही आग्रही असल्याचे चित्र निर्माण झाले असताना सत्यजीत कदम आणि कृष्णराज महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. खासदार धनंजय महाडिकही दोन दिवस मुंबईतच होतेे. त्यामुळे या चर्चेत भर पडली, तर एकीकडे शिंदेसेनेकडून प्रकाश आबिटकर आणि चंद्रदीप नरके यांची उमेदवारी जाहीर झाली; परंतु क्षीरसागर यांचे नाव जाहीर झालेले नाही. त्यामुळे ‘उत्तर’च्या उमेदवारीचा गुंता वाढला आहे.काँग्रेस कोण उमेदवार देते यावरून महायुतीचा उमेदवार निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. भाजपने या मतदारसंघासाठी केलेला सर्व्हे आधार धरून उमेदवारी निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने ती जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.मधुरिमा, मालोजीराजे यांचा लढण्यास नकार, उमेदवारीबद्दलची उत्कंठा शिगेलाकोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे आमदार सतेज पाटील, मधुरिमाराजे, मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत न्यू पॅलेस येथे इच्छुक उमेदवारांची बैठक झाली, त्यावेळी या तिघांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरचा काँग्रेसचा उमेदवार कोण याबद्दलची उत्कंठा पुन्हा ताणली गेली.न्यू पॅलेस येथे झालेल्या बैठकीस आमदार पाटील, मालोजीराजे यांच्यासह इच्छुक असलेले आमदार जयश्री जाधव, वसंतराव मुळीक, आनंद माने, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, दुर्वास कदम उपस्थित होते. आर. डी. पाटील मात्र अनुपस्थित होते. बैठकीत आनंद माने यांनी इच्छुकांच्यावतीने भूमिका मांडली. शिवसेना की काँग्रेस ?कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेस तसेच उबाठाने या जागेवर जोरदार आग्रह धरला आहे. या जागेबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

गत निवडणुकीची पुनरावृत्ती..गेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण याबद्दल कमालीची उत्सुकता तयार झाली होती. रोज एक नाव वृत्तपत्रात येत होते. परंतु अखेरच्याक्षणी चंद्रकांत जाधव यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये येऊन अर्ज भरला आणि लढत जिंकली होती. यंदाही पक्षाकडून उमेदवारीचा घोळ अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस झाले तरी सुरूच आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील