शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: उमेदवार दक्ष, केवळ व्हॉट्सॲपवर संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:02 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची कारवाई टाळता यावी, म्हणून उमेदवार, तसेच प्रमुख राजकीय पक्षांनी विशेष खबरदारी घेतली आहे. प्रचार ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची कारवाई टाळता यावी, म्हणून उमेदवार, तसेच प्रमुख राजकीय पक्षांनी विशेष खबरदारी घेतली आहे. प्रचार करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचा जसा फायदा होतो, तसाच तोटाही होत आहे, यासाठी निवडणूक विभाग आणि पोलिस विभाग दक्ष असून, त्यासाठी दक्षता पथकही नेमलेले आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले, तरी त्यामुळे उमेदवार किंवा पक्ष अडचणीत येऊ शकतो, हे जाणून उमेदवार संवाद साधण्यासाठी प्रचंड काळजी घेत आहेत. ‘निरोप’ पोहचले नाहीत तरी चालतील, पण व्हॉट्सॲप कॉलशिवाय बोलणे नकोच, अशी त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.सोशल मीडियावरील फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट यांसारखी साधने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. या माध्यमातून थेट प्रचार होत असला, तरी सर्वसामान्य मतदार मात्र व्हॉट्सॲपवर अधिक दिसून येतो. त्यामुळे हेच माध्यम अधिकतर वापरले जात आहेत. मात्र, मोबाइलवरून साधलेला संवाद व्हायरल होत असल्याने अनेक नेते अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत.

मुद्दाम प्रश्न उपस्थित करून बोलण्याच्या ओघात भलताच प्रश्न विचारून उमेदवाराला तोंडघशी पाडायचे आणि तो संवाद व्हायरल करण्याचा प्रकार काही उमेदवारांबाबत घडला, म्हणून सर्वच पक्ष आणि त्यांचे उमेदवार प्रचार काळात व्हॉट्सॲपवरून कॉल करू लागले आहेत. आता राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया द्यायची झाल्यास उमेदवार म्हणतो, थांबा व्हॉट्सॲप कॉल करतो. तंत्रस्नेही नसलेले त्यांचे पी.ए.कडून असा कॉल लावून घेत बोलत आहेत.मोबाइलवर बोलणे बंद चांगल्या माहितीपेक्षा खोटी माहिती वेगाने पसरत असल्यामुळे सोशल मीडियावरची राजकीय वादावादी रंगत आहे. आता ॲडमिनपण पटकन चुकीची टीका डिलीट करीत खबरदारी घेत आहेत, पण सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विशेष खबरदारी घेत आहेत. मोबाइलवर बोलणे बंद आणि ओन्ली व्हॉट्सॲप हाच संवादासाठी सोईचा मार्ग ठरला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Social Mediaसोशल मीडियाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024