महापौर निलोफर आजरेकर यांचे नगरसेवक पद रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:22 IST2020-07-07T11:16:52+5:302020-07-07T11:22:25+5:30
कोल्हापूर : पदाचा गैरवापर करून खासगी मिळकतीमध्ये ड्रेनेज लाईन व पेव्हिंग ब्लॉक टाकण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. या ...

महापौर निलोफर आजरेकर यांचे नगरसेवक पद रद्द करा
ठळक मुद्देमहापौर निलोफर आजरेकर यांचे नगरसेवक पद रद्द कराभाजपच्यावतीने नगर विकासच्या मुख्य सचिवांकडे मागणी
कोल्हापूर : पदाचा गैरवापर करून खासगी मिळकतीमध्ये ड्रेनेज लाईन व पेव्हिंग ब्लॉक टाकण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. या प्रकरणी महापौर निलोफर आजरेकर यांचे नगरसेवक पद अपात्र ठरावावे, अशा मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना दिले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष मारुती भागोजी, अमोल पालोजी, भारती जोशी, राजू मोरे, नजीर देसाई यांनी या निवेदनाची प्रत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिली. बाबूजमाल तालीम परिसरात तीन लाखांच्या निधीची तरतूद केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.