शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द करा

By admin | Updated: July 16, 2015 23:57 IST

इचलकरंजी नगराध्यक्षांची मागणी : दोघा नगरसेवकांचाही समावेश

इचलकरंजी : सभागृहामध्ये माईकची आदळाआपट, मुख्याधिकाऱ्यांना धमकावत गाडीच्या आडवे झोपून त्यांना घेराव घालणे आणि नगराध्यक्षांशी हुज्जत घालून अशोभनीय कृत्य करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नगरपालिकेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव व सभागृहात मोर्चा घुसविल्याप्रकरणी कॉँग्रेसचे नगरसेवक भीमराव अतिग्रे यांना नगरसेवकपदावरून दूर करावे, अशा आशयाची मागणी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच नगराध्यक्षांनी पक्षप्रतोद व उपनगराध्यक्षांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्यामुळे नगरपालिकेत राजकीय वादाची तीव्रता वाढली आहे. नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल होत असला, तरी तो मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली ४३ सदस्यांची संख्या पूर्ण होत नसल्याने बिरंजे यांनी सुद्धा ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ९ जुलै रोजी झालेली सभा उपनगराध्यक्षांना अध्यक्षांच्या खुर्चीवर न बसविणे, शाब्दिक चकमक, नगरसेवकांमध्ये झालेली हमरीतुमरी, प्रचंड गोंधळ अशा कारणांमुळे जोरदार गाजली होती. त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत नगराध्यक्षांनी आपल्या निवेदनात नमूद केला आहे. सभेमध्ये १ ते १५ विषय झाले असताना सभागृहाबाहेर आलेल्या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी मी व उपनगराध्यक्ष जाधव हे सभागृहाबाहेर जात आहोत, असे सांगून ज्येष्ठ सदस्य अजित जाधव यांना तात्पुरते सभाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यावेळी उपनगराध्यक्ष सभागृहाबाहेर आले नाहीत. त्यांनी, पक्षप्रतोद सुनील पाटील, रवी रजपुते व अन्य सदस्यांनी रणजित जाधव यांना सभाध्यक्ष करावे म्हणून गोंधळ केला. मुख्याधिकारी सुनील पवार यांनी सभेचे कामकाज बंद पाडणे ही बाब बेकायदेशीर असल्याची सूचना दिली. त्यानंतर अतिग्रे मोर्चा बाहेर घेऊन गेले; पण सभागृहातील वातावरण कमालीचे तापले होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे मागणी‘त्या’ सभेदिवशी पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव व भीमराव अतिग्रे यांनी नगराध्यक्षांशी हुज्जत घालून अशोभनीय कृत्य करून गैरवर्तणूक केली आहे. म्हणून महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ४२ (१) व (२) आणि ५५ अ प्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा बिरंजे यांनी केली आहे.