शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

'कॅग'च्या दणक्याने बोगस बांधकाम कामगार होणार उघड, बांधकाम व्यवसायात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 11:53 AM

कोल्हापूर जिल्हयात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली

कोल्हापूर : शहर आणि जिल्हयात मोठ्या संख्येने नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांची चौकशी कॅग संस्थेकडून (महालेखापरीक्षक) होत असल्याने बांधकाम व्यवसायातही खळबळ उडाली. यातून बोगस कामगार उघड होणार आहेत. परिणामी गावा गावात बोगस बांधकाम कामगार कोण ? यासंबंधी चर्चा रंगली आहे.जिल्हयात तीन वर्षात मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांची नोंदणी झाली. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन करता येते. यासाठी बांधकाम कामगार असल्याचा ग्रामसेवक किंवा बांधकाम अभियंत्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. हे दाखले मिळवून बांधकाम कामगार नसलेल्या अनेकजणांनी नोंदणी केल्याचा संशय कॅगला आला आहे. खोट्या बांधकाम कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आणि खरे वंचित राहिले असाही प्रकार काही ठिकाणी झाला आहे. यासंबंधीचा संशय आल्याने गेल्या आठ दिवसांपासून कॅगकडून बांधकाम कामगार नोंदणीची सखोल चौकशी केली जात आहे. यासाठी मुंबईहून आलेले पथक येथे तळ ठाेकून आहे. पहिल्या टप्यात पथकाने जिल्हयातील बांधकाम कामगारांना कोणत्या योजनांचा लाभ मिळाला, कोणत्या गावातील कामगारांना मिळाला याची माहिती घेतली.आता सर्वाधिक दाखले दिलेल्या बांधकाम अभियंत्यांना बोलवून चौकशी केली जात आहे. ही चौकशी एकेका अभियंत्यास बोलवून करण्यात येत आहे. गोपनीय असल्याने यासंबंधीची अधिकृत माहिती बाहेर पडलेली नाही. पण चौकशीसाठी बोलवलेले अभियंते आपल्या कोणते प्रश्न चौकशी अधिकाऱ्याने विचारले प्रश्नांची माहिती बांधकाम कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत. ज्या संघटनांचे बांधकाम कामगार बोगस नोंदणीच्या रॅकेटमध्ये आहेत, ते आता त्यांच्या बचावासाठी पळापळ करत आहेत.

बांधकाम कामगारांना ५० पेक्षा अधिक दाखले दिलेल्या अभियंत्यांची सखोल चौकशी करावी. दोषी आढळल्यास कारवाई व्हावी. चौकशी पथकाने बोगस बांधकाम कामगारांची संख्या उघड करावी. त्यांची नोंदणी रद्द करून त्यांच्याकडून शासनाचा लाभ वसूल करावा. - शिवाजी मगदूम, सचिव, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर..

टॅग्स :kolhapurकोल्हापूर