शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

आॅनलाईनने खरेदी करताय? सावधान...! स्वस्त वस्तूंच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:40 AM

विनोद सावंत  कोल्हापूर : स्वस्तात वस्तू मिळत असल्यामुळे सर्रास आता आॅनलाईनने खरेदी केली जात आहे. मात्र, आॅनलाईन खरेदीच्या बहाण्याने ...

ठळक मुद्देबँकांकडून ग्राहकांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या जात आहेत. जलद गतीने घरबसल्या बँकिंग सेवा मिळण्यासाठी आॅनलाईन बँकिंग सुरू केले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा जसा फायदा होतो तसे तोटेही होतात,

विनोद सावंत कोल्हापूर : स्वस्तात वस्तू मिळत असल्यामुळे सर्रास आता आॅनलाईनने खरेदी केली जात आहे. मात्र, आॅनलाईन खरेदीच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळीच सक्रिय झाली आहे. त्यांच्याकडून नामवंत कंपनीच्या नावाचा गैरवापरही सुरू आहे. त्यांच्या स्वस्त वस्तू देण्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडत आहेत. अशा गंडा घालणाऱ्या टोळीपासून सावधान रहा; के्रडिट कार्ड, एटीएमचे पासवर्ड, ओटीपी नंबर सांगू नका, असे आवाहन बँका, सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

‘हॅलो, बँकेतून बोलतो आहे...’ असे सांगून एटीएमचा पासवर्ड घेऊन लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार वाढत असताना आता आॅनलाईनने खरेदी करणाऱ्यांचे ओटीपी नंबर घेऊन फसवणुकीचे प्रकारही वाढतच आहेत. त्यामुळे बँका आणि सायबर सेलसमोर आॅनलाईनवरून होणारी फसवणूक ही आव्हान ठरत आहे.

बँकांकडून ग्राहकांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या जात आहेत. जलद गतीने घरबसल्या बँकिंग सेवा मिळण्यासाठी आॅनलाईन बँकिंग सुरू केले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा जसा फायदा होतो तसे तोटेही होतात, याची अनेक उदाहरणे आहेत. त्याला आॅनलाईन बँकिंगही अपवाद नाही. या सेवांचा वापर सतर्कतेने केला नसल्यामुळे अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. नाशिकमध्ये एका नामवंत सहकारी बँकेतील ३४ ग्राहकांच्या के्रडिट कार्डचा ओटीपी नंबर घेऊन १६ लाखांचा गंडा घातल्याची ताजी घटना आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आॅनलाईनने खरेदी करणाºयांच्या फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे.बँकांनी आवाहन करूनही फसवणूकबँकेच्या वतीने ग्राहकांना फोन करून पासवर्ड अथवा ओटीपी नंबरची माहिती घेतली जात नाही, अशा आशयाचे संदेश मोबाईलवर दर आठ दिवसांनी बँका देत आहेत. तरीही काही ग्राहक गंडा घालणाºयाच्या गोड बोलण्यास फसत आहेत. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या सायबर क्राइमचा रेशो वाढत आहे. ओटीपी सांगितल्याने खात्यावरील रक्कम काढल्यानंतर बँकाही काहीही करू शकत नाहीत. ग्राहकांवर पश्चात्ताप करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय समोर राहत नाही.बोगस आर्मी जवानांपासून सावधानजुन्या वस्तू खरेदी-विक्री करणारी एक नामवंत आॅनलाईन कंपनी आहे. या कंपनीचा गैरफायदा घेऊन गंडा घालणारी टोळीच सक्रिय झाली आहे. या टोळीच्या जाळ्यात अनेकजण सापडत आहेत. ग्राहकांची सहानुभूती मिळविण्यासाठी ते आर्मी जवान असल्याचे सांगून वाहन अथवा वस्तूविक्रीच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालत आहेत. त्यांच्याकडून बोगस आयकार्ड आॅनलाईनवर टाकले जाते. त्याला अनेकजण फसले जात असल्याची माहिती सायबर सेलकडून देण्यात आली आहे. 

स्वस्त वस्तूंच्या आमिषाला बळी पडू नकासायबर क्राइमला आळा बसण्यासाठी ग्राहकांची सतर्कता महत्त्वाची आहे. विश्वसनीय कंपनी असल्याची खात्री करूनच आॅनलाईनने खरेदी करावी. वस्तू घरात पोहोच झाल्यानंतरच पैसे द्यावेत. स्वस्त वस्तू देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. उत्पादनखर्चापेक्षा कमी दरात कोणतीही कंपनी वस्तू देऊ शकत नाही. ‘स्वस्त वस्तू म्हणजे धोका,’ हे ओळखले पाहिजे. संबंधिताने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करू नये. ओटीपी नंबर देऊ नये.- मंगेश देसाईसाहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, कोल्हापूर

 

टॅग्स :onlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर