Kolhapur: धूळ चेहऱ्यावर मात्र ते आरसा साफ करत राहिले, मंडलिकांबद्दल मंत्री मुश्रीफांचे सुतोवाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:22 IST2026-01-24T18:18:42+5:302026-01-24T18:22:12+5:30

आमची इच्छा होती की त्यांनी आमच्यात यावे, पण..

But with a dusty face he kept cleaning the mirror, Minister Mushrif words about the Sanjay Mandalik | Kolhapur: धूळ चेहऱ्यावर मात्र ते आरसा साफ करत राहिले, मंडलिकांबद्दल मंत्री मुश्रीफांचे सुतोवाच 

Kolhapur: धूळ चेहऱ्यावर मात्र ते आरसा साफ करत राहिले, मंडलिकांबद्दल मंत्री मुश्रीफांचे सुतोवाच 

कागल : कोणाला एकटे पाडण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलेलो नाही. आमची इच्छा होती की त्यांनी पण आमच्यात यावे, पण आले नाहीत. भविष्यात असे काम करायचे आहे..आज जरी घडले नसले तर भविष्यात हे करू, असे सुतोवाच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता केले. मात्र, भाषणाच्या शेवटी धूळ चेहऱ्यावर मात्र ते आरसा साफ करीत राहिले आहेत, असा शेरही सुनावला.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा येथील गहिनीनाथनगरमधील मैदानावर आयोजित केला होता. यावेळी संजयबाबा घाटगे, समरजित घाटगे, अरुंधती घाटगे, नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, युवराज पाटील, रणजितसिंह पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे, अमरसिंह घोरपडे, राजेखान जमादार, एम. पी. पाटील, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण उपस्थित होते. 

समरजित घाटगे म्हणाले, आमची लढाई कोणाविरुद्ध नाही. ज्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे त्यांनी परत यावे नंतर तिन्ही गटांत जागा उरणार नाही. संजय घाटगे, रणजितसिंह पाटील, भैय्या माने, अंबरीष घाटगे, विजय काळे, राजेंद्र भोरे, सुनूल मगदूम यांची भाषणे झाली. शशिकांत खोत यांनी आभार मानले.

Web Title : कोल्हापुर: मुश्रीफ ने मंडलिक के साथ सुलह के संकेत दिए, परोक्ष आलोचना भी।

Web Summary : मंत्री मुश्रीफ ने संजय मंडलिक के साथ भविष्य में सहयोग का संकेत दिया, लेकिन अतीत के मतभेदों का भी उल्लेख किया। आगामी चुनावों के लिए संयुक्त रैली में एकता का आग्रह किया गया।

Web Title : Kolhapur: Mushrif hints at reconciliation with Mandlik, offers veiled criticism.

Web Summary : Minister Mushrif subtly indicated future collaboration with Sanjay Mandlik, while also hinting at past disagreements. Joint rally held for upcoming elections urged unity.