शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बसची चाचणी पुढील आठवड्यात

By admin | Updated: December 19, 2014 00:12 IST

बेळगावातच पाहणी : केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर मिळणार २५ बस

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून केएमटी खरेदी करणाऱ्या १०४ नव्या बसेसपैकी प्रोटोटाईप मॉडेल बसची चाचणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली येथील ड्रायव्हिंग अँड डिझायनिंग स्पेसिफिकेशन आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनच्या पथकाकडून बसच्या चाचणीसाठीची अद्याप वेळ निश्चित झालेली नाही. यानंतरच पहिल्या टप्प्यातील २५ बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्रीय पथकाकडून अशोक लेलँड कंपनीच्या बेळगाव येथील वर्कशॉपमध्येच ही चाचणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘केएमटी’ला फेब्रुवारी महिन्यात केंद्र शासनाकडून बस खरेदी, प्रशस्त वर्कशॉप व जीपीएस तंत्रज्ञान, आदींसाठी ४४ कोटींचा निधी मिळाला. प्रवासी क्षमता व केंद्रीय नियमावली, परिवहन सदस्यांची नेमक्या एका कंपनीला ठेका मिळविण्यासाठी राजीनामा नाट्य, तसेच टाटा मोटर्सची उच्च न्यायालयात याचिका यामुळे बस खरेदी प्रक्रिया लांबली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील बसची चाचणी दोन महिने पुढे गेली.बेळगाव येथील वर्कशॉपमध्ये ‘केएमटी’ला पुरवठा करण्यात येणाऱ्या बसचे मॉडेल तयार आहेत. याची नुकतीच ‘केएमटी’च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आवश्यक बदल सुचविले आहेत. या बसची आज, गुरुवारी चाचणी होईल अशी केएमटी प्रशासनाला अपेक्षा होती; मात्र केंद्रीय पथकाची वेळ अद्याप मिळालेली नाही. यामुळे या बसची चाचणी पुढील आठवड्यात होईल. यानंतर तीन आठवड्यांत २५ बसेस केएमटीला मिळतील. व पुढील प्रत्येक महिन्यात प्रत्येकी २५ बसेसचा पुरवठा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)जनता गाडीला शहरातील प्रवासी घेण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी केएमटीला प्रवाशांतून मोठी मागणी आहे. सध्या केएमटीला दररोज अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागतो. नव्या बसेसमुळे केएमटीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे; मात्र नवीन बस लांबणीवर पडू लागल्याने तोट्यातील केएमटीपुढील अडचणीत भरच पडत आहे.