पिरवाडी येथे तीन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:38 IST2019-08-26T15:34:15+5:302019-08-26T15:38:48+5:30
पिरवाडी (ता. करवीर) येथील तीन बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन एलईडी टिव्हीसह एक लाख किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. दोन दिवसात चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.

पिरवाडी येथे तीन ठिकाणी घरफोडी
कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील तीन बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन एलईडी टिव्हीसह एक लाख किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. दोन दिवसात चार घरफोड्या झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.
पिरवाडी परिसरातील जयसिंगपूर इंगवले कॉलनी येथे दिनकर भिवा पाटील (वय ६२, मुळ रा. गुडाळ, ता. राधानगरी) यांचे घर आहे. त्यांच्या शेजारीच शिवाजी किशाप्पा पाटील, सचिन सिडलाप्पा थरकार यांची घरे आहेत. ही तिन्हे घरे बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा व कुलपे तोडून घरातील रोकड, टिव्हीसह अन्य साहित्य लंपास केले.
याप्रकरणी दिनकर पाटील यांनी करवीर पोलीसात फिर्याद दिली. दोन दिवसापूर्वी पुईखडी-पीरवाडी येथे शार्दूल विनोद प्रभुदेसाई व रोहन कारंडे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी ५० हजारांचे साहित्य लंपास केले होते. या परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभित झाले आहेत. लागोपाठ पाच घरफोड्या करुन चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले आहे.