संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:05+5:302021-07-19T04:16:05+5:30

इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व रोटरी सेंट्रल अ‍ॅनस् समितीच्यावतीने होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी ...

Brief news | संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व रोटरी सेंट्रल अ‍ॅनस् समितीच्यावतीने होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. नागनाथ बसुदे व यास्मिन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष यतीराज भंडारी यांनी स्वागत केले. कार्यक्रमास बाळासाहेब देवनाळ, नितीन शहा, सायली होगाडे, रूपाली तारदाळे आदी उपस्थित होते.

मीनाक्षी तंगडी यांची निवड

इचलकरंजी : इनरव्हिल क्लबच्या सन २०२१-२२ वर्षाकरिता मीनाक्षी तंगडी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी मनाली मुनोत, तर खजिनदारपदी शुभांगी माळी यांची एकमताने निवड झाली. अध्यक्षस्थानी रेखा भंडारी होत्या. कार्यकारिणीमध्ये श्रद्धा झंवर, मुग्धा शहा, स्नेहा मराठे, अंजली लाहोटी, ज्योती मोहता, सपना शहा, रेखा भंडारी, राखी बांगड, चंदा कोठारी, केतकी मेहता, ईशा खंडेलवाल, आशा छापरवाल यांचा समावेश आहे.

Web Title: Brief news