दुकानात घुसून साहित्याची तोडफोड; दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:41 IST2021-02-23T18:39:29+5:302021-02-23T18:41:18+5:30
Crime News Kolhapur- दुकान गळ्यावरील ताबा सोडावा यासाठी दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कसबा बावडा येथील जय हिंद पार्कमध्ये सोमवारी घडला. नुशरत शाहनूर मुजावर (वय 32), शबाना मोहम्मद तहसीलदार (दोघेही रा. कसबा बावडा) अशी जखमींची नावे आहेत.

दुकानात घुसून साहित्याची तोडफोड; दोघांना मारहाण
कोल्हापूर: दुकान गळ्यावरील ताबा सोडावा यासाठी दुकानात घुसून साहित्याची तोडफोड करून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार कसबा बावडा येथील जय हिंद पार्कमध्ये सोमवारी घडला. नुशरत शाहनूर मुजावर (वय 32), शबाना मोहम्मद तहसीलदार (दोघेही रा. कसबा बावडा) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित सुशांत पाटील सह चार ते पाच जणांनी जय हिंद पार्कमध्ये येऊन नुशरत मुजावर यांच्याशी वादावादी केली. माझा भाऊ प्रमोद पाटील याचा हा दुकान गाळा आहे तू दुकानगाळ्यावरील हक्क सोडला नाहीस तर तुला बघून घेईल अशी धमकी दिली.
संशयित आरोपीने दुकानात घुसून साहित्याची तोडफोड केली. तसेच नुसरत मुजावर यांच्यासह त्यांची मावशी शबाना तहसीलदार यांना मारहाण केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुशांत पाटील, प्रकाश पाटील, राजाराम मोरे व एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.