शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओंना दुसऱ्या दिवशीही ठोका

By admin | Updated: July 18, 2015 00:58 IST

युवतींना दिलासा : न्यू पॅलेस, ताराबाई पार्क परिसरातील महाविद्यालयाजवळ धरपकड सुरू

कोल्हापूर : विनापरवाना वाहन चालविणे, महाविद्यालयाचे ओळखपत्र नसणे व महाविद्यालयाच्या आवारात टिंगलटवाळी करणाऱ्या रोडरोमिओंवर आज, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही शाहूपुरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. रमणमळा येथील न्यू पॅलेस परिसर, ताराबाई पार्क परिसरातील विवेकानंद महाविद्यालयाजवळ पोलिसांनी रोडरोमिओंची धरपकड सुरू केली. काही रोडरोमिआेंना ‘उठा-बशा’, तर काहीजणांकडून ‘मी या महाविद्यालय परिसरात फिरकणार नाही,’ अशी हमी घेत त्यांना सोडून दिले.गेले दोन दिवस शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १६) सुमारे ७७ रोडरोमिओंवर कारवाई केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत रोडरोमिंओवर कारवाई केली. त्यामध्ये न्यू पॅलेस परिसरातील एका विद्यालयाजवळ कट्ट्यावर बसलेल्या रोडरोमिओंना तसेच विनापरवाना दुचाकी वाहन घेऊन ‘घिरट्या’घालणाऱ्यांना पकडले. या सर्वांना एका झाडाखाली थांबून उठा-बशा काढण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून ‘मी या महाविद्यालय परिसरात येणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेत त्यांना सोडून देण्यात आले.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलीस महावीर महाविद्यालयामार्गे ताराबाई पार्क परिसरात गेले. त्याठिकाणी विवेकानंद महाविद्यालयाच्या दोन नंबर प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोडरोमिओंची धरपकड सुरू केली, तर काहीजणांनी पोलीस आल्याचे पाहताच तेथून ‘धूम’ठोकली. त्यामुळे रस्त्यावर शांतता पसरली. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या काहींना पकडून ‘याच महाविद्यालयात आहे का?’ अशी विचारणा करत त्यांचे महाविद्यालयीन ओळखपत्र ताब्यात घेतले. तो विद्यार्थी याच महाविद्यालयातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमारे २० ते २५ मिनिटे पोलीस या प्रवेशद्वाराजवळ थांबून होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हा प्रकार काही समजेना. टिंगलटवाळी करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन पाटील, अमर आडूळकर, किरण गावडे, विशाल बंदरे, समीर माने यांच्या पथकाने केली.(प्रतिनिधी)