Kolhapur: साडेचार कोटींचे पंचगंगा काठचे बोटॅनिकल गार्डन पुन्हा बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:17 IST2025-07-30T18:16:59+5:302025-07-30T18:17:34+5:30
कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा या जागेत मागील वर्षापासून तयार करण्यात येत असलेले बोटॅनिकल गार्डन नदीला आलेल्या ...

Kolhapur: साडेचार कोटींचे पंचगंगा काठचे बोटॅनिकल गार्डन पुन्हा बुडाले
कोल्हापूर : येथील पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा या जागेत मागील वर्षापासून तयार करण्यात येत असलेले बोटॅनिकल गार्डन नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पुन्हा बुडाले आहे.
बोटॅनिकल गार्डनला चार कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. आधी ही गार्डन रंकाळा येथे होणार होती, पण अचानक पंचगंगा नदीजवळील राबाडे मळा जागेत वळवले. मागील वर्षी पहिल्या पुरात गार्डन पुराच्या पाण्यात बुडाले. नुकसान झाले.
जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी याठिकाणी मैदान करून गार्डन अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने हे गार्डन पंचगंगा नदीकाठावरच करण्याचा घाट घातला. पुन्हा हे काम चालू झाले आहे. पण यावर्षी दुसऱ्यांदा पुराचे पाणी पात्राबाहेर आले आणि गार्डन पुरात बुडाले.
गंगावेश मार्गे येणारे नाला, गटारीचे पाणी थेट या गार्डनमध्ये सोडले आहे. त्यामुळे गार्डनची गटारगंगा झाली आहे. या कामात सहभागी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर झालेल्या नुकसानीचा खर्च बसवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे.