शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दहावी परीक्षेत कमी गुण मिळाले, बोरवडेतील विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले; गळफास घेत जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:50 IST

मुरगुड : मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात ६२.८० टक्के गुण मिळून ही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश होऊन कागल तालुक्यातील ...

मुरगुड : मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात ६२.८० टक्के गुण मिळून ही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश होऊन कागल तालुक्यातील बोरवडे येथील ऋषिकेश नितीन साठे (वय १६) या विद्यार्थ्याने घरीच तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. निकालाचा आनंदोत्सव सुरू असताना, ही दुदैवी घटना उघडकीस आल्याने बिद्री पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.कागल तालुक्यातील बोरवडे येथील ऋषिकेश साठे याने दुपारी ऑनलाइन निकाल पाहिला. त्याला ६२.८० टक्के गुण मिळाले होते. त्याने सायंकाळी सहाच्या सुमारास घरातील माळ्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी तत्काळ त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.ऋषिकेश अत्यंत मनमिळावू आणि होतकरू विद्यार्थी होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा आहे त्याच्या अचानक जाण्याने बोरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो गावातीलच बोरवडे विद्यालय, बोरवडे येथे दहावीत शिकत होता. त्याच्या आत्महत्येमुळे त्याचे आई-वडील आणि नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत बाजीराव शिवाजी साठे याने याबाबत मुरगूड पोलिसात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल