Bomb blasts seized in Male Mudshingi | कोल्हापूरमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त; 69 क्रूड बॉम्बसह दोघांना अटक
माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरातून ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मंगळवारी पोलिसांनी जप्त केले.

ठळक मुद्देडुकरांची शिकार करण्यासाठी बॉम्ब बनविल्याची कबुलीउजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य अशाच प्रकारे आहे. त्यांच्याकडून या साहित्याची विक्री झाल्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले. संशयित विलास राजाराम जाधव (वय ५२) व आनंदा राजाराम जाधव ( ५४) यांना पोलिसांनी अटक केली. बॉम्ब बनविण्यासाठी वापरलेले साहित्य कोठून आणले तसेच त्यांचा वापर कोठे झाला, त्यांची विक्री कोणाला केली, उजळाईवाडी स्फोटासंबंधी यांचा काही संबंध आहे काय, याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली.

संशयितांनी भुईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होतो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य आणि संशयितांकडे मिळून आलेले साहित्य एकाच प्रकारचे आहे. त्यांनी स्फोटके ठेवली होती की ज्यांना विक्री केली त्यांनी ठेवली होती, याबाबत चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

उजळाईवाडी स्फोटामध्ये ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा हकनाक बळी गेला आहे. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने, हरीश पाटील यांना खब-याकडून माहिती मिळाली की, माले मुडशिंगी येथील विलास जाधव व आनंदा जाधव हे गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करतात. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दोघांच्या घराची झडती घेतली असता बॉम्ब बनविण्याच्या साहित्यासह पांढ-या व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ गावठी तयार बॉम्ब असा सुमारे सात हजार किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली. सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे, आदी साहित्य वापरून गावठी बॉम्ब बनवीत असल्याची त्यांनी कबुली दिली.

बॉम्बला रक्तीच्या आवरणाचा वापर करून रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्यांचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य अशाच प्रकारे आहे. त्यांच्याकडून या साहित्याची विक्री झाल्याची शक्यता आहे. त्यांनी हे साहित्य उड्डाणपुलाखाली ठेवले होते की अन्य कोणी, याबाबत त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
 

  • विलास जाधव (आरोपी) -आनंदा जाधव (आरोपी) याबाबत त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

 


Web Title: Bomb blasts seized in Male Mudshingi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.