शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:39 IST

याबाबत प्रथमच कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली

कोल्हापूर : दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्रे आणि मृत्यूचे बनावट दाखले सादर करून बोगस बांधकाम कामगारांनी शासनाला ४४ लाख ७७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत सांगलीतील सहायक कामगार आयुक्त रोहित विश्वनाथ गोरे (वय ३४, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी मंगळवारी (दि. २९) रात्री कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला. बोगस बांधकाम कामगारांच्या विरोधात राज्यात प्रथमच मोठी कारवाई होत असल्याने बनावटगिरी केलेले बांधकाम कामगार आणि एजंटांचे धाबे दणाणले आहेत. लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीसोबतच आता या क्षेत्रातील बनावटगिरी उघड झाली आहे.कामगार खात्याकडून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी काही कामगारांनी बनावटगिरी केल्याचे प्रकार तपासणीत समोर आले. सांगली येथील सहायक कामगार आयुक्त रोहित गोरे यांनी कोल्हापुरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून लाभ घेतलेल्या अर्जदारांची तपासणी केली. या तपासणीत २० कामगारांनी खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून प्रत्येकी दोन लाखांचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले तसेच दोन प्रकरणांमध्ये आधीच मृत्यू झालेल्या कामगारांची खोटी मृत्यू प्रमाणपत्रे सादर करून नातेवाईकांनी लाभ घेतल्याचे लक्षात आले. काही जणांनी बांधकाम कामगार असल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर केली आहेत. याबाबत गोरे यांच्या फिर्यादीनुसार शाहूपुरी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.यांच्यावर गुन्हा दाखलकागल तालुक्यातील अनिल पांडुरंग कळके (रा. माद्याळ), चारूदत्त जोशी (चौगुले गल्ली, कागल), दत्तात्रय सदाशिव मोरबाळे (मुरगूड), सुरेश नारायण भोई (चिमगाव), बाळासोा गणपती लोंढे (सोनगे), तानाजी भाऊ खंडागळे, अश्विनी आप्पासोा मेटकर, रणजित कृष्णात हसबे, महेश तुकाराम बंबरे, विवेक राजाराम अस्वले, सुभाष निवृत्ती वंदाकर (सर्व रा. मुरगूड),

बापूराव परशुराम मोहिते (हळदी), संजय दत्तात्रय आगाज (चिमगाव), विलास परशुराम मोहिते (हळदी), सुनील शांताराम भराडे (निढोरी), भुदरगड तालुक्यात शीतल अमोल नाईक (खानापूर), अक्षय चंद्रकांत मेंगाणे (निळपण), रमेश केरबा चव्हाण (गारगोटी) अतिश विलास दाभोळे (वाघापूर), अशोक खंडेराव घोडके (म्हसवे),

सुनीता राजाराम बावडेकर (बाजारवाडी, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), राजश्री शहाजी पवार (सातार्डे, ता. पन्हाळा), शुभम सुरेश तुरंबेकर (राधानगरी रोड, कोल्हापूर), सागर मधुकर वागरे (करंजफेण, ता. राधानगरी)

कारवाईने खळबळबांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यात राज्यात सर्वत्रच अनियमितता आहे. याबाबत प्रथमच कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून, काही एजंटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.