शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

Kolhapur: गर्भलिंग निदान: मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:30 PM

संशयितांची भेट घेण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्क येथे घरात थाटलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्राचा सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याला करवीर पोलिसांनी बुधवारी (दि. १७) सायंकाळी फुलेवाडी चौकातून अटक केली. अटकेतील तिन्ही संशयितांनी गेली दीड वर्षापासून अवैध गर्भलिंग निदान केंद्र चालवल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. अटकेतील टेक्निशियन अमित केरबा पाटील (वय ३३, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) आणि एजंट कृष्णात ऊर्फ सुशांत आनंदा जासूद (वय ३३, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील हा गेली दीड वर्षापासून क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील अमित डोंगरे याच्या घरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट चालवत होता. बुधवारी सायंकाळी गावाकडे बालिंगा येथे जाण्यासाठी तो फुलेवाडी चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.अमित डोंगरे हा एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असल्याने त्याला सोनोग्राफी मशीन चालवण्याचे ज्ञान आहे. तिसरा संशयित जासूद हा ग्राहकांचा शोध घेऊन त्यांना मुलगाच होण्याचे औषध दिले जाईल, असे सांगत होता. या तिघांनी गेली दीड वर्षात शंभरहून अधिक महिलांचे गर्भलिंग निदान केल्याचा संशय आहे. पुरावे राहू नयेत, यासाठी त्यांनी तपासणीसाठी येणाऱ्या महिलांचे रजिस्टर ठेवले नाही. संशयितांना सुमारे दोन लाख रुपये किमतीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कोणाकडून मिळाले? गर्भपाताची औषधे कोणाकडून घेतली जात होती? गर्भपात केल्यानंतर भ्रूणांची विल्हेवाट कुठे लावली? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.राजकीय नेत्यांची वर्दळसंशयितांमधील एजंट कृष्णात जासूद याची पत्नी निगवे दुमाला गावची लोकनियुक्त सरपंच आहे. त्याच्या अटकेनंतर बुधवारी दिवसभर निगवे दुमाला गावातील राजकीय पुढाऱ्यांनी करवीर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. संशयितांची भेट घेण्यासाठी पुढाऱ्यांची धडपड सुरू होती.एमआर बनला बोगस डॉक्टरबोगस डॉक्टर स्वप्निल पाटील याचे बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. काही वर्षे त्याने एका औषध कंपनीत विक्री प्रतिनिधी पदावर काम केले. गेली दीड वर्षापासून त्याने अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे काम सुरू केले. मुलगा होण्याचे औषध देण्याचा दावा तो करीत होता. त्याला सोनाग्राफी मशीन आणि गर्भपाताची औषधे पुरवणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपातdoctorडॉक्टरPoliceपोलिस