पन्हाळ्यात लोकमतचे रक्तदान शिबीर उत्साहात, ३० जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:36 IST2021-07-05T11:26:55+5:302021-07-05T11:36:18+5:30
Blod Donetion Camp Lokmat Kolhapur : नातं रक्ताचं, नातंजिव्हाळ्याचं या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला पन्हाळ्यात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या रक्तदान मोहिमेत मृत्युंजय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी रक्तदान केले. यावेळी नगराध्यक्षा रुपाली धडेल, रविंद्र धडेल, प्रविण कुराडे, संग्रामसिंह भोसले, राव चरणकर व मान्यवर उपस्थित होते.
पन्हाळा : नात रक्ताच, नात जिव्हाळ्याच या लोकमतच्या राज्यव्यापी महारक्तदान आभियानाला पन्हाळ्यात मोठ्या उत्साहात रक्तदान मोहिमेत मृत्युंजय मंडळाने उस्फुर्त प्रतीसाद देत सुमारे तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पन्हाळा येथील नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात मृत्युंजय मंडळ, पन्हाळा युवा प्रतिष्ठान व नगरपरिषद पन्हाळा यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिरात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, ११७ वेळेला रक्तदान करण्यासाठी आलेले जगदाळेवाडीचे आणी लोकमतचे अंक विक्रेते रघुनाथ जगदाळे, ब्रान्डशेफ जाहिरातचे सिईओ अमरसिंह भोसले, मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष व तालुका होमगार्ड समादेशक संग्रामसिंह भोसले, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंदार नायकवडी, पत्रकार सचिन वरेकर आदिंसह मान्यवरांनी रक्तदान केले.
आजच्या रक्तदान शिबिरास वैभवीलक्ष्मी ब्लड बँकचे सहकार्याने डॉक्टर अहेर यांचे व्यवस्थापनाखाली व लोकमतचे निर्मिती व्यवस्थापक बाजिराव ढवळे, जाहिरात विभागाचे संभाजी खवरे यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर झाले.