कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली. निकम आणि जरग यांच्या निवडीने कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा फडकला आहे. निकम व जरग यांची बहुमताने निवड होताच त्यांच्या समर्थकांनी वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना ४६ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सचिन मारुती शेंडे यांना ३५ मते पडली. त्यामुळे रूपाराणी निकम या विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसच्या दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. जरग यांना ४६ तर कदम यांना ३५ मते मिळाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक ३४ जागा जिंकून देखील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. निवडणुकीत काँग्रेससोबत असणाऱ्या उद्धवसेनेला केवळ एकच जागा मिळाल्याने सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांना संख्याबळाची अडचण आली. या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार धनंजय महाडिक यांच्या घराण्याने महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. तर आपल्या पक्षाचा महापौर करण्याचे भाजपचेही स्वप्न पूर्ण झाले.
Web Summary : Rupa Rani Nikam (BJP) is Kolhapur's mayor, Akshay Jarg (Jansurajya) deputy. The Mahayuti alliance won, defeating Congress despite their majority seats. Mahadik's family regained dominance; BJP realized its mayoral dream.
Web Summary : रूपा रानी निकम (भाजपा) कोल्हापुर की महापौर, अक्षय जरग (जनसुराज्य) उपमहापौर चुने गए। महायुति गठबंधन जीता, कांग्रेस की बहुमत सीटों के बावजूद हार हुई। महाडिक परिवार का दबदबा फिर कायम; भाजपा का महापौर का सपना साकार।