शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरनाईकांच्या आडून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या आडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक भाजपच्या अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रताप सरनाईक पूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये असल्याने ते आपले चांगले मित्र आहेत. विधीमंडळात अर्णव गोस्वामी व कंगना राणावत यांच्याविरोधात त्यांनी हक्कभंग आणल्यानंतर भाजपने त्यांच्या मागे चौकशीचा सिसेमिरा लावला आहे. आता मंत्री अनिल परब, आमदार रवींद्र वायकर यांच्या मागेही केंद्रीय तपास यंत्रणा लावल्याने सरनाईक यांनी हे वक्तव्य केल्याचे दिसते.

शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलं

दोन्ही काॅंग्रेस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडत असल्याचा आरोप चुकीचा आहे. राज्यात एक-दोन ठिकाणी असे झाले असेल, मात्र कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या सत्तेत दहा सदस्य असतानाही तीन सभापतीपदे शिवसेनेला दिली. ‘गोकुळ’मध्ये सहा जागा दिल्या, हेही लक्षात ठेवले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणावर फेरयाचिका

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार फेरयाचिका दाखल करणार आहे. सोळा जिल्ह्यांत ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण जाते, तिथे अडचण असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

तर जनता माफ करणार नाही

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मोठ्या हिमतीने आपले आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरे यांची इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्रीपदी बसवले. आता कोणी वेगळा विचार करत असेल तर महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.