कोल्हापूरमध्येही भाजपचा जल्लोष--शहरात सशस्त्र बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:02 IST2019-11-23T12:32:11+5:302019-11-23T16:02:34+5:30
भाजप कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात आनंदोत्सव... धनंजय महाडिक, अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी

भाजप कार्यकर्त्यांचा शिवाजी चौकात आनंदोत्सव... धनंजय महाडिक, अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी
कोल्हापूर : राज्यात भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार आल्याने आज सकाळी बिंदू चौक येथे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. साखर व पेढे वाटून त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, स्थिर सरकारचा हा निर्णय भाजपाने जाहीर करताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून पदयात्रा काढत येथील शिवाजी चौकात मोठा आनंदोत्सव साजरा केला.
या पदयात्रेत धनंजय महाडीक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पूरपरिस्थीतीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी स्थिर सरकार येणे अत्यंत गरजेचे होते असे महाडीक यावेळी म्हणाले.
शहरात सशस्त्र बंदोबस्त
कोल्हापूर : राज्यातील राजकीय घडामोडींचे पाश्व॔भूमीवर शहरात महत्वाचे चौक; धामिर्क स्थळे; सव॔ पक्षांचे काय॔लये आदी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत....संपूण॔ शहरात तणावपूर्ण शांतात आहे......