भाजपा ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढविणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:19 IST2020-12-19T19:17:27+5:302020-12-19T19:19:34+5:30
gram panchayat Election kolhapur - भाजपा तर्फे गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ताकदीने लढवल्या जातील, अशी घोषणा गडहिंग्लज साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रकाश चव्हाण यांनी केली.

गडहिंग्लज येथे आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रकाश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शिवाजी पाटील, हेमंत कोलेकर,जयश्री तेली, मारूती राक्षे, उपस्थिती होते.
गडहिंग्लज : भाजपा तर्फे गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ताकदीने लढवल्या जातील, अशी घोषणा गडहिंग्लज साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रकाश चव्हाण यांनी केली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील,अॅड. हेमंत कोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी सभापती प्रा. जयश्री तेली,अॅड. कोलेकर, तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, अनिल खोत, संदीप नाथबुवा यांचीही भाषणे झाली.
बैठकीस गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिषकुमार साखरे,कार्याध्यक्ष संजय बटकडली,मारुती राक्षे, मार्तंड जरळी, विजय मगदूम, बसवराज कंकणवाडी, दिनेश मदकरी, संदीप चव्हाण, संतोष कल्याणी, संतोष तेली,प्रशांत पाटील संदीप रोटे,संजय पाटील आदी उपस्थित होते.