शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार, सुरेश हाळवणकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:52 IST

राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वी स्थानिक पातळीमध्ये महायुतीत दुरावा

इचलकरंजी : जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणाशीही युती न करता स्वबळावर लढविण्याची घोषणा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केली. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचे दिसत आहे.भाजपचे नवनिर्वाचित आमदार राहुल आवाडे यांचा इचलकरंजी भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.हाळवणकर म्हणाले, शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे शटर बंद झाले आहे. फक्त ताराराणी पक्षाचे शटर सुरू आहे. त्यांनी ते बंद करून इकडे यावे. भाजपला मिळालेला विजय हा सांघिक आहे. जिल्ह्यामध्ये पक्ष मोठा व्हावा, यासाठी आवाडे यांना स्वीकारले. लोकसभेपेक्षा १८ हजारांचे अधिक मताधिक्य या निवडणुकीत मिळाले. २४ बूथमध्ये १८०० मतांनी आम्ही कमी आहोत, याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा. जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा संदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्यानुसार कोणत्याही पक्षाशी युती न करता या निवडणुका लढविल्या जातील.इचलकरंजी महापालिकेचे ६२ नगरसेवक निवडून आणण्याबरोबरच भाजपचा महापौर केला जाईल. कोणत्या भागात मते कमी पडली, याचा विचार केला जाईल. जे पक्षातून लांब गेले, कमळाला अपमानित केले, त्यांना स्थान दिले जाणार नाही. प्रकाश आवाडे व माझ्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, ताराराणी पक्ष भाजपमध्ये विसर्जित करता येतो का? याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती घेतली जाईल. आगामी स्थानिक निवडणुकीत उमेदवारी देताना संबंधित भागात पडलेल्या मतांचे मोजमाप केले जाईल. आमदारकी हे मिरविण्याचे पद नाही, त्यामागे मोठी जबाबदारी आहे. राहुलला २४ तास काम करावे लागेल. तो ते करील, या विश्वासानेच त्याला उमेदवारी दिली होती.राहुल आवाडे म्हणाले, सन २०१९ ला भाजपची सत्ता गेल्यानंतर काही संस्था आपल्या हातून निसटल्या आहेत. त्यामध्ये आपण लक्ष घालण्याची गरज आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांमध्ये १९ नगरपालिका व जि.प.चे काही मतदारसंघ आहेत. तेथेही ताकद देण्याची गरज आहे. अमृत भोसले यांनी स्वागत केले. यावेळी मिश्रीलाल जाजू, सतीश डाळ्या, महावीर गाठ, अहमद मुजावर, तानाजी पोवार, विकास चौगुले, शेखर शहा, आदी उपस्थित होते.‘जवाहर’चे दार उघडाहाळवणकर यांनी जवाहर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रकाश आवाडे यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर ‘आम्ही पक्षात तुमच्यासाठी गेट उघडले आहे. तुम्ही कार्यकर्त्यांसाठी ‘जवाहर’चा दरवाजा उघडा’ अशी मिस्कील टिप्पणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाElectionनिवडणूक 2024Suresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर