BJP corporator Kurade in NCP ..! | भाजपचे नगरसेवक कुराडे राष्ट्रवादीत.., गडहिंग्लजमध्ये पाटी पुन्हा कोरी

गडहिंग्लज येथील भाजपाचे नगरसेवक दीपक कुराडे यांनी कागलमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.

ठळक मुद्देभाजपचे नगरसेवक कुराडे राष्ट्रवादीत..! गडहिंग्लजमध्ये भाजपाची पाटी पुन्हा कोरी

गडहिंग्लज : शहरातील प्रभाग एक मधील भाजपाचे नगरसेवक दीपक कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून पक्षात स्वागत केले.

नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रभाग एक मधून कुराडे व शशिकला दयानंद पाटील हे भाजपातर्फे निवडून आले होते. वर्षापूर्वी शशिकला पाटील यांनी जनता दलात प्रवेश केला आहे. त्यानंतर कुराडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे नगरपालिकेत भाजपाची पाटी पुन्हा कोरी झाली.

दरम्यान, याच प्रभागातून राष्ट्रवादीतर्फे लढून पराभूत झालेले माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांचा पराभव केलेल्या दीपक कुराडे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने बेरीज केली.

निवडणुकीनंतर भाजपा - सेनेने सत्ताधारी जनता दलाबरोबर आघाडी केली होती. कुराडे यांच्या प्रवेशाने पालिकेच्या सभागृहातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या एकूण ६ झाली. जनता दलाचे नगरसेवक १३ तर शिवसेनेचा एक असे बलाबल झाले आहे.
 

Web Title: BJP corporator Kurade in NCP ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.