Crime News भर चौकात तलवारीने कापला वाढदिवसाचा केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:35 IST2020-04-29T16:33:50+5:302020-04-29T16:35:57+5:30

हा प्रकार माऊली पुतळ्यानजीक दौलतनगर परिसरात मंगळवारी रात्री उशीरा घडला. या प्रकरणी राजारामपूृरी पोलिसांनी सराईत सहा गुन्हेगारावर गुन्हे नोंदवले आहेत.

Birthday cake cut with a sword in Bhar Chowk | Crime News भर चौकात तलवारीने कापला वाढदिवसाचा केक

Crime News भर चौकात तलवारीने कापला वाढदिवसाचा केक

ठळक मुद्देदौलतनगरातील प्रकार : विरोध करणाऱ्या पोलिसांस धक्काबुक्की; राजारामपूरी पोलिसांत सहा सराईत गुन्हेगारांवर कारवाई

कोल्हापूर : संचारबंदी कालावधीत भर रस्त्यावर समुहाने एकत्र येऊन वाढदिवस साजरा करताना तलवारीचा वापर करुन केक कापण्यात आला. हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणाºया पोलीस मुख्यालयातील जलदगती प्रतिक्षादलाच्या पोलीसाला चक्क धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार माऊली पुतळ्यानजीक दौलतनगर परिसरात मंगळवारी रात्री उशीरा घडला. या प्रकरणी राजारामपूृरी पोलिसांनी सराईत सहा गुन्हेगारावर गुन्हे नोंदवले आहेत.

ऋषिकेश उर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, शंकर उर्फ अनुष्का (पूर्ण नाव नाही), नितीन उर्फ बॉब दिपक गडीयल, अर्जुन ठाकुर, पंकज पोवार, यश काकरे (सर्व रा, नवशा मारुती मंदीर परसर, दौलतनगर, राजारामपूरी) अशी गुन्हा नोंदविलेल्यांची नावे आहेत. बंदोबस्तातील पंकज बारड यांनी या युवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या युवकांनी थेट पोलीस बारड यांनाच धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Birthday cake cut with a sword in Bhar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.