चारचाकी अन् दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 19:51 IST2022-12-31T19:51:09+5:302022-12-31T19:51:19+5:30
अपघात शनिवारी दुपारच्या दरम्यान घडला. संबधित घटनेची सीपीआर पोलिस चोकीत नोंद करण्यात आली आहे.

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी; कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील घटना
- सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील हनुमानगरातील माने सर्व्हिसिंग सेटर समोर चारचाकी आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.निलेश दामोदर माने (वय ३७ रा.शांतीनगर, नाचणी जि.रत्नागिरी) असे जखमींचे नाव आहे. अपघात शनिवारी दुपारच्या दरम्यान घडला. संबधित घटनेची सीपीआर पोलिस चोकीत नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून बत्तीशिराळावरून जोतिबा देवदर्शन करून चारचाकी गाडी कोल्हापूरला जात होती.(चारचाकी गाडीतील लोकांची नावे समजू शकलेली नाही) तर कोल्हापूरहुन दुचाकीवरून निलेश माने गावी रत्नागिरीला जात असताना रोडवरील हनुमार नगरातील माने सर्व्हिसिंग सेंटर समोर दुचाकी आणि चारचाकी यांची समोरासमोर जोराची धडक झाली.निलेश यांच्या उजवा पायाला गंभीर दुखापत झाली.
चारचाकीच्या चालक बाजू चेपली असून दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.माने यांच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना खाजगीत दाखल केले आहे.माने कोल्हापूरात वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.करवीर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.