शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

"बिद्री" सुरू करण्यासाठी कामगारांचा संचालक मंडळाला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 3:59 PM

बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे.

सरवडे - बिद्री साखर कारखाना ऊस दराबरोबर सर्व कारभारात राज्यात अव्वल असताना शिवाय, कोणाचीही देणी थकीत नसताना असा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ चालू होणे गरजेचे आहे. मात्र शेतकरी संघटनेच्या निर्णयाचा या कारखान्याला फटका सहन करावा लागणार आहे. कारखाना अपेक्षित दर देणार असतानाही अशा कारखान्याचे कामकाज बंद ठेवणे सभासद व ऊस उत्पादकांना अर्थिक संकटात टाकणारे ठरणार आहे. यासाठी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू केलाच पाहीजे, अन्यथा कार्यकारी संचालकांना घेवून कारखान्याचे कामकाज मंगळवारपासून आम्ही सुरू करू असा इशारा बिद्रीच्या कामगारांनी देत संचालक मंडळाला घेराव घातला आहे. कारखाना सुरू करण्याचे आश्वासन मिळेपर्यंत हा घेराव कायम ठेवून कामगारांनी "सुरू करा, सुरू करा बिद्री कारखाना सुरू करा" अशा घोषणाबाजीने कारखान्याचे सभागृह दणाणून सोडले. अध्यक्ष के. पी. पाटील यांनी कामगारांच्या भावना समजून घेतल्या. मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

बाळासाहेब फराकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाच्या उत्पन्नात घट झाली असून रिकव्हरी व वजनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात शंभर गुऱ्हाळे सुरू आहेत. तर कार्यक्षेत्रातील ऊस अन्य कारखान्यांना आमच्याच कारखान्याच्या गेटवरुन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या सर्वाचा परिणामही बिद्री कारखान्याच्या आर्थिक घडीवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने चांगला चाललेल्या बिद्री साखर कारखाना बंद करण्याचा अट्टहास सोडावा. संचालक मंडळाने याचा गांभिर्याने विचार करावा अन्यथा कामगार स्वत: च्या जबाबदारीवर कारखाना सुरू केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.   ऊस वाहतूक संघटनेचे नेते वसंतराव शिंदे म्हणाले, बिद्रीने ऊस उत्पादकांबरोबर कंत्राटदार व कामगार यांची देणी भागवली आहेत. तर दिवाळीला सुमारे 8 कोटी मागील देणे कारखान्याने दिले आहे. तसेच सातत्याने एफआरपीपेक्षाही अधिक दर दिला आहे. असे असताना बिद्रीवरच आंदोलन करणे चुकीचे आहे. अन्य कारखाने सुरू आहेत. बिद्रीच्या बहुतांशी टोळ्या कारखाना कार्यक्षेत्रात येऊन अनेक दिवस झाले, मात्र हा कारखाना सुरू नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणखीन काही दिवस ही परिस्थिती अशीच राहिली तर टोळ्या अन्य कारखान्यांकडे जाण्याची शक्यता आहे. याचा एकूण परिणाम कारखान्याच्या एकूण कारभारावर होवू शकतो. म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यावेळी अमर पाटील, जगन्नाथ पुजारी, वसंत कोंडेकर, सुनिल पिराले अशोक पाटील आदी कामगारांनी आक्रमकपणे आपल्या व्यथा मांडल्या.  या सभागृहात अध्यक्ष के. पी. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक गणपतराव फराकटे, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, युवराज वारके, कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर