अज्ञात वाहनाच्या धडकेत भुदरगडच्या तरुणाचा मृत्यू, उत्तूर-गडहिंग्लज मार्गावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:55 IST2022-05-27T15:52:18+5:302022-05-27T15:55:35+5:30
उत्तूर : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भुदरगड येथील तरुणाचा मृत्यू झाला. किरण ज्योतिबा इंगळे (वय २६, रा. बारवे, ता. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत भुदरगडच्या तरुणाचा मृत्यू, उत्तूर-गडहिंग्लज मार्गावर झाला अपघात
उत्तूर : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भुदरगड येथील तरुणाचा मृत्यू झाला. किरण ज्योतिबा इंगळे (वय २६, रा. बारवे, ता. भुदरगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. उत्तूर - गडहिंग्लज मार्गावरील वांजळेवाडी वसाहत समोर हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरण इंगळे हे गडहिंग्लज येथे एका शोरूम मध्ये नोकरीस होते. ते आज सकाळी कामाला जाण्यासाठी बारवे येथून गडहिंग्लजला आपल्या दुचाकी क्रमांक (MH-०९- EE-६३०७) वरून जात होते. दरम्यान, वांजोळेवाडी वसाहती समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पोलिसात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.