Kolhapur- Sugarcane Rate: 'भोगावती'ने ३ हजार ६५३ रुपये दराची केली घोषणा, उद्यापासून गळीत हंगाम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:59 IST2025-11-06T16:57:48+5:302025-11-06T16:59:06+5:30
अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांची घोषणा

Kolhapur- Sugarcane Rate: 'भोगावती'ने ३ हजार ६५३ रुपये दराची केली घोषणा, उद्यापासून गळीत हंगाम सुरू
भोगावती : परिते (ता.करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाला ऊसाला राज्यात सर्वाधिक ३ हजार ६५३ रुपये मे.टन अंतिम ऊस दराची घोषणा करत, आज (शुक्रवार) पासून गळीत हंगामाला सुरुवात करत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील आणि संचालक मंडळाने पत्रकार बैठकीत दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याची आर्थिक परिस्थिती धोकादायक असताना देखील शेतकऱ्यांचे हित डोळयांसमोर ठेवून सध्याच्या बाजारभाव, उत्पादन खर्च व साखरेच्या दरांचा विचार करून आम्ही योग्य आणि समाधानकारक असा दर निश्चित केला आहे. कारखाना वेळेवर सुरू करून शेतकऱ्यांच्या ऊसाचे लवकर गाळप व्हावे, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवारपासून गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
गेल्या गळीत हंगामात चार लाख २१ हजार ७८८ मॅट्रिक टन ऊसाचे गाळप करून पाच लाख ३७ हजार ८७० लाख साखर होती. उत्पादित करत १२.७५ साखर उतारा मिळवला होता. त्या आधारे या हंगामात एफआरपी रक्कम तीन हजार ६५२ रुपये ६० पैसे एवढी पडत आहे. यामध्ये ४० पैसे वाढ करत ३ हजार ६५३ रुपये अंतिम ऊस देणार असल्याची सांगितले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक सागर पाटील, शेती अधिकारी सातापा चरापले, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.