हिल रायडर्सतर्फे भवानी मंडप कमानीस मंगल तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:47 IST2019-10-09T17:46:26+5:302019-10-09T17:47:17+5:30

कोल्हापूर येथील हिल रायडर्स तर्फे मंगळवारी जुना राजवाडा (भवानी मंडप) कमानीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेते आनंद काळे, सन्मती मिरजे, विजय देवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सूर्यकांत पाटील, प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले.

Bhawani Pavilion Commandant Mang Toran by Hill Riders | हिल रायडर्सतर्फे भवानी मंडप कमानीस मंगल तोरण

हिल रायडर्सतर्फे मंगळवारी भवानी मंडप कमानीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेते आनंद काळे, सन्मती मिरजे, विजय देवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सूर्यकांत पाटील, प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देहिल रायडर्सतर्फे भवानी मंडप कमानीस मंगल तोरणउपक्रमाचे यंदाचे ३१ वे वर्ष

कोल्हापूर : येथील हिल रायडर्स तर्फे मंगळवारी जुना राजवाडा (भवानी मंडप) कमानीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेते आनंद काळे, सन्मती मिरजे, विजय देवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सूर्यकांत पाटील, प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले.

साहस हा पाया, ऐतिहासिक वास्तूचे जतन हे ध्येय उराशी बाळगून या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे. मुख्य हेतूंनी विजयादशमीदिवशी कमानीस तोरण बांधण्यात येते. या उपक्रमाचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील कोंडाजी बाबा या भूमिकेतील उत्कृष्ट अभिनयाबद्दल अभिनेते आनंद काळे यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान महापुरावेळी काम केलेल्या बांधिलकी फौंडेशन, सावली फौंडेशन, वुई केअर, रोटरी मुव्हमेंन्ट, उमेद फौंडेशन, पॅराडाईज ग्रुप, जीवन ज्योत, जीवन आधार, आपत्कालीन जिल्हा व्यवस्थापन या संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी गिर्यारोहणाच्या सरावासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरुवात करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

विनोद कांबोज यांनी सूत्रसंचालन केले. सागर बगाडे यांनी आभार मानले. अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी संयोजन केले. यावेळी पी. जी. जाधव, प्रसाद कदम, श्रावणी पसारे, शिवतेज पाटील, जयदीप जाधव, सूरज ढोली, विनायक कालेकर, युवराज साळोखे, प्रसाद आडनाईक, सचिन नरके, निखिल कोळी, आरदी यादव, राणाजी पाटील, विकास अष्टेकर, सतीश यादव, निशांत कावणेकर उपस्थित होते.
 

 

Web Title: Bhawani Pavilion Commandant Mang Toran by Hill Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.