शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सधन करवीरमध्येच ‘बेटी बचाओ’ला हरताळ

By admin | Updated: January 22, 2015 00:19 IST

समतोल बिघडला : दरहजार मुलांमागे सर्वांत कमी मुली करवीर तालुक्यात

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर -जिल्ह्यात मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण करवीर तालुक्यात सर्वांत कमी आहे. डिसेंबर २०१४ अखेर एक हजार मुलांमागे ८८७ मुली असे चिंताजनक प्रमाण असून सधन, सुशिक्षित लोकच मुलींचा जन्म नाकारण्यात ‘नंबर वन’ राहिल्याचे पुढे आले आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने हरियाणातील मुलींच्या घटत्या संख्येवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहे. यामुळे स्त्री-भ्रूणहत्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  राज्यात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख ‘सधन’ म्हणून आहे. सधन जिल्हेच स्त्री-भ्रूणहत्येत आघाडीवर राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक संस्था, आरोग्य विभाग यांच्याद्वारे व्यापक जागृती केली जात आहे. गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. अंगणवाडी व आरोग्यसेविका यांच्यातर्फे गर्भवती मातेवर प्रसूती होईपर्यंत अप्रत्यक्षपणे नजर ठेवली जात आहे.सध्या विविध माध्यमांतून मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे. आता नुकतेच केंद्र शासनही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा उपक्रम राबवीत आहे. तरीही करवीर तालुक्यात मुलींचा टक्का वाढत नसल्याचे समोर आले आहे. या तालुक्यात शहराचा समावेश होतो. शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री सहजपणे उपलब्ध आहे. सधन आणि उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासनाची करडी नजर असली तरी ‘नकोशी’ला गर्भातच मारले जात आहे. करवीर संस्थानची स्थापना केलेल्या रणरागिणी ताराराणीच्या भूमीतच हे शरम आणणारे वास्तव समोर आले आहे.२००१ पासून ३४ मुली वाढल्याकरवीर तालुक्यात २००१ ते २०१४ अखेर फक्त३४ मुली वाढल्या आहेत. आरोग्य विभागाकडून कितीही प्रयत्न केले तरी मुलींचा टक्का वाढत नाही. याउलट डोंगराळ, खेड्यांचा भाग अधिक असलेल्या चंदगड तालुक्यात २००१ मध्ये ९२१ मुली होत्या. डिसेंबर २०१४ अखेर ९८५ अशी मुलींची संख्या झाली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये चंदगड तालुक्यात मुलग्यांपेक्षा मुलींचीसंख्या ११ ने वाढून १०११ झाली होती. अजूनही ‘मुलगाच वंशाचा दिवा’ अशी मानसिकता आहे. समाजात मान अधिक असल्यामुळे स्त्रीलाही मुलगाच हवा असे वाटते. यामुळे गर्भातच स्त्री-भ्रूणाची हत्या केली जात आहे. सहज उपलब्धता, पैसे, सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक असल्यामुळे शहरात स्त्री-भ्रूण खुडण्याचे प्रमाण अधिक आहे.- तनुजा शिपूरकर, सचिव, महिला दक्षता समितीसधनता, सुशिक्षितता, सहज गर्भलिंग तपासणी सुविधा, आदी कारणांमुळे करवीर तालुक्यात मुलींची संख्या कमी आहे, हे वास्तव आहे. करवीर तालुक्यात मुलींचे प्रमाण का वाढत नाही, याचा शोध घेण्यासाठी ६०० महिलांचा सर्व्हे येत्या १५ ते २० दिवसांत केला जाणार आहे. सर्व्हेतील अहवालानंतर विशेष उपाययोजनांचा आराखडा करण्यात येईल.- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारीदर हजार मुलांमागे मुलींची संख्या