शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा किलो सोने घेऊन बंगाली कारागीर पळाला, सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ; कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Updated: February 15, 2024 17:07 IST

कोल्हापूर : गुजरीतील कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समध्ये तिस-या मजल्यावर राहणारा काशीनाथ बंगाली हा कारागीर ४० लाख रुपये किमतीचे ...

कोल्हापूर : गुजरीतील कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समध्ये तिस-या मजल्यावर राहणारा काशीनाथ बंगाली हा कारागीर ४० लाख रुपये किमतीचे सुमारे ५५० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन गायब झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आला. कारागिरासह त्याच्याकडील कामगारांचेही मोबाइल बंद आहेत. या घटनेने गुजरीत खळबळ उडाली असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे.गुजरीत दागिने घडविण्याचे काम बंगाली कारागिरांकडून केले जाते. विश्वासाने सराफ रोज त्यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने सोपवतात. कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समधील काशीनाथ बंगाली याच्याकडे काही सराफांनी दागिने घडविण्यासाठी सोने दिले होते. गुरुवारी सकाळी काही सराफ दागिने आणण्यासाठी गेले असता, बंगाली कारागिराचे घर बंद असल्याचे दिसले. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन लागला नाही. कामगारांचेही मोबाइल बंद असल्याने सराफांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. दुपारपर्यंत तीन सराफांचे सुमारे ५५० ग्रॅम सोने बंगाली कारागिराकडे असल्याची माहिती समोर आली.घटनेची माहिती मिळ‌ताच जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गरगटे कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि रवींद्र कळमकर यांनी परिसराची पाहणी केली. कारागिराच्या घराला कुलूप असल्याने बाहेर सराफांनी गर्दी केली होती. दागिने घडविण्यासाठी सोने दिलेल्या कारागिरांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस