कोडोली : जोतिबा देवदर्शनासाठी दुचाकी वाहनावरून चाललेल्या भाविकांवर कोडोली-गिरोली मार्गावर अचानक आलेल्या मधमाश्यांनी पाच जणांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन महिलांसह पाच जण जखमी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. ओम राजेंद्र गुरव (रा. कोल्हापूर) यांना मोठ्या प्रमाणावर चावल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबतची माहिती अशी, धनाजी खोंद्रे, अनिता खोंद्रे, श्रेया खोंद्रे (रा. जाखले) तसेच रोहित कांबळे (रा. केखले) हे या मार्गावरून जात असताना त्यांनाही मधमाश्यांनी हल्ला करून जखमी केले. मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याने हे सर्वजण रस्त्याच्या कडेला पडले. यावेळी अन्य प्रवाशांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करून रुग्णवाहिकेच्या मदतीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या परिसरात वाळलेले गवत पेटविल्याने मधमाश्यांच्या पोळ्यास आगीची झळ लागल्याने मधमाश्यांनी रौद्ररूप धारण करून नागरिकांवर हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डोंगर पेटविला जात असल्याने अशा घटना पुन्हा घडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी घाटातून प्रवास करताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Summary : Near Kodoli, Kolhapur, a bee attack injured five Jyotiba devotees traveling by motorcycle. One person is seriously injured. Dry grass burning near the hive likely provoked the bees. Travelers should be cautious.
Web Summary : कोडोली के पास, मोटरसाइकिल पर यात्रा कर रहे जोतिबा के पांच भक्तों पर मधुमक्खियों ने हमला कर दिया, जिससे वे घायल हो गए। एक व्यक्ति गंभीर रूप से घायल है। छत्ते के पास सूखी घास जलाने से मधुमक्खियाँ उत्तेजित हुईं। यात्री सतर्क रहें।