कोरोची येथे किरकोळ कारणावरून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:31 IST2021-08-18T04:31:27+5:302021-08-18T04:31:27+5:30

संगीता दारासिंग सागरे ( वय ४४ ) यांच्या तक्रारीवरून सिद्राम रघुनाथ सागरे, कमल सिद्राम सागरे, महादेवी तुकाराम ननवरे, तुकाराम ...

Beaten for minor reasons at Korochi | कोरोची येथे किरकोळ कारणावरून मारहाण

कोरोची येथे किरकोळ कारणावरून मारहाण

संगीता दारासिंग सागरे ( वय ४४ ) यांच्या तक्रारीवरून सिद्राम रघुनाथ सागरे, कमल सिद्राम सागरे, महादेवी तुकाराम ननवरे, तुकाराम मनोहर ननवरे, तर माधवी तुकाराम ननवरे यांच्या तक्रारीवरून संगीता सागरे, प्रियांका माने, आकाश सागरे ( सर्व रा. कोरोची ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वरील गुन्हा दाखल झालेले हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. संगीता यांनी नात आरुषी हिला खेळण्याकरिता आमच्याकडे द्या असे म्हटल्याच्या कारणावरून सिद्राम व कमल यांनी शिवीगाळ केली. सिद्राम याने संगीता यांना लाकडी काठीने हातावर मारहाण केली. महादेवी यांनी शिवीगाळ, तर तुकाराम याने शिवीगाळ करत ढकलून दिल्याचे संगीता यांनी तक्रारीत म्हटले आहे. माधवी यांच्या आई कमल यांच्या उजव्या हातावर संगीता यांनी काठीने मारहाण करत शिवीगाळ केली. आकाश याने तुकाराम यांना खाली पाडले. संगीता, प्रियांका व आकाश यांनी मिळून सिद्राम यांच्या अंगावर जात जिवे मारण्याची धमकी देत अंगणातील तुळशीची कुंडी फोडून नुकसान केल्याचे माधवी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Beaten for minor reasons at Korochi