मलकापूर : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्र शासनाच्या कृषी धोरणाविरोधात शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, बांबवडे, शाहूवाडी शहरांत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद दिला. शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने निषेध फेरी काढून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
मलकापूर, बांबवडे, शाहूवाडी येथील बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी वडाप, आदी सर्व वाहने बंद होती. बंदचा परिणाम मलकापूर आगारातील एस. टी. सेवेवर झाला. शेतकरी संघर्ष समितीने मलकापूर, शाहूवाडी बाजारपेठेत निषेध फेरी काढली. यावेळी शेकापचे भारत पाटील, राजाराम मगदूम, अनिल कांबळे, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार, नगरसेवक सुहास पाटील, राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील, पंडित केसरे, स्वभिमानी संघटनेचे अमोल महाजन, सचिन मुडशिंगीकर, आदींसह शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ०८ मलकापूर बंद
केंद्र शासनाच्या कृषी धोरणांच्या विरोधात मलकापुरात शेतकरी संघर्ष समितीने निषेध फेरी काढली. यावेळी भारत पाटील, प्रकाश पाटील, सुहास पाटील, अमोल महाजन, आदी.