शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

‘मोहल्ला अस्सी’वर बंदी घाला

By admin | Updated: July 12, 2015 21:24 IST

सावंतवाडीत आंदोलन : हिंदू संघटनांची मागणी

सावंतवाडी : भगवान शिव आणि श्रीक्षेत्र काशी यांचा अवमान करणाऱ्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटावर बंदी घाला. तसेच संबंधितांवर शासनाने गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शनिवारी येथील गांधी चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन, हिंदू जनजागृत समिती व हिंदू संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संदेश गावडे, राजा मळेवाडकर, संदीप आळवे, एकनाथ सावंत, सीताराम म्हापणकर, गीतेश परब, रघुनाथ सावंत, रंजना राऊळ, उषा निकम, सुचिता सावंत, पल्लवी पेडणेकर आदी उपस्थित होते. कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या ‘मोहल्ला अस्सी’ या हिंदूद्रोही चित्रपटास सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये भगवान शिव, साधूसंत, देवनदी, गंगा आणि काशी क्षेत्र यांचा हीन पातळीवर जाऊन उल्लेख करण्यात आला आहे. हिंदू संत, देवता यांचा अवमान करणाऱ्या आणि अश्लाघ्य विडंबन करणाऱ्या ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटावर तत्काळ बंदी आणावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (वार्ताहर)