Kolhapur: आदमापुरात बाळूमामांचे मंदिर दोन दिवस बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:28 IST2023-10-09T15:26:24+5:302023-10-09T15:28:03+5:30

वाघापूर : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील ...

Balumama temple in Adamapur will be closed for two days | Kolhapur: आदमापुरात बाळूमामांचे मंदिर दोन दिवस बंद राहणार

Kolhapur: आदमापुरात बाळूमामांचे मंदिर दोन दिवस बंद राहणार

वाघापूर : कर्नाटक, आंध्र, गोवा, कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा देवालय मंदिराचा गाभारा व मंदिर परिसराची साफसफाई पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि. ९) व मंगळवार (दि.१०) या दोन्ही दिवशी मंदिर बंद राहणार आहे. बुधवारपासून (दि.११) मंदिर भाविकांसाठी खुले राहील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

रविवारपासून (दि. १५) शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. याच दिवशी घटस्थापना केली जाते.
यानिमित्ताने देवालय व कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वच्छतेची मोहीम राबवून देवालय व देवालयाचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील सजावट सुवासिक फुलांनी केली जाते. नऊ दिवस हा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये भाविक भक्तांची दर्शनासाठी रीघ लागलेली असते. त्याप्रमाणे याहीवर्षी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार असल्याने भाविकांना श्रींचे दर्शन मंदिराबाहेरून लांबून घ्यावे लागणार आहे.

Web Title: Balumama temple in Adamapur will be closed for two days