शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

Kolhapur: बालिंगा दरोड्यातील शूटरला इंदूरमध्ये ठोकल्या बेड्या, सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:09 IST

दरोड्यानंतर पोलिसांनी स्थानिक तीन संशयितांना तातडीने अटक केली होती

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये आठ जूनला भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून सुमारे दोन कोटींचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील परप्रांतीय शार्पशूटरला पोलिसांनी अटक केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे छापा टाकून संशयित अंकित ऊर्फ छोटू श्रीनिवास शर्मा (वय २३, रा. अम्बाह, जि. मुरैना, मध्य प्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दरोड्यातील १५० ग्रॅम सोने, दोन पिस्तूल, सात काडतुसे, कार असा सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्यायनी ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यानंतर पोलिसांनी स्थानिक तीन संशयितांना तातडीने अटक केली होती. मात्र, त्या गुन्ह्यातील चार परप्रांतीय दरोडेखोर पसार होते. मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेताना, त्यातील एक संशयित इंदूर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली.

त्यानुसार पथकाने एक सप्टेंबरला अंकित शर्मा याचा माग काढला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नातील शर्मा याला अटक केली. त्याने साथीदारांसह कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याच्याकडील पाच मोबाइल, डोंगल, सीमकार्ड, दरोडा घालताना अंगावर घातलेली कपडे हस्तगत केले. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार रामचंद्र कोळी, संजय हुंबे, संजय कुंभार, विलास किरोळकर, सागर चौगले, सुरेश पाटील, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.शर्मावर १५ गुन्हेअटकेतील अंकित शर्मा हा तेराव्या वर्षांपासून गुन्हेगार आहे. त्याच्यावर मध्यप्रदेशातील तीन पोलिस ठाण्यांमध्ये १४ गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेशातील अनेक टोळ्यांमध्ये शार्पशूटर म्हणून तो काम करीत होता.

अन्य आरोपींची नावे निष्पन्नअंकित शर्मा याच्या चौकशीतून दरोड्यातील अन्य तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली. ते तिघेही मध्यप्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांची माहिती मिळाली असून, लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळून दरोड्यातील मुद्देमाल जप्त केला जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंडित यांनी दिली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस