पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळत असल्यावरून बलकवडे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:02 IST2021-01-11T18:57:59+5:302021-01-11T19:02:17+5:30
River pollution Muncipal Corporation Kolhapur- जुना बुधवार पेठ परिसरातील सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिसळते ही गंभीर बाब आहे, हे तुमच्या निदर्शनास कसे आले नाही. येथून पुढे प्रदूषणाबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. थेट कारवाई केली जाईल, अशा शब्दांत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी महापालिकेच्या मुकादम, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना झापले.

पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळत असल्यावरून बलकवडे आक्रमक
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ परिसरातील सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिसळते ही गंभीर बाब आहे, हे तुमच्या निदर्शनास कसे आले नाही. येथून पुढे प्रदूषणाबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. थेट कारवाई केली जाईल, अशा शब्दांत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी महापालिकेच्या मुकादम, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना झापले.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी आरोग्य विभागासंदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणले.
बैठक झाल्यानंतर डॉ. बलकवडे यांनी तातडीने आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि संबंधित कर्मचाऱ्यांची त्याच ठिकाणी बैठक घेतली,याबाबत त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.