राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

By राजाराम लोंढे | Published: January 24, 2024 05:05 PM2024-01-24T17:05:12+5:302024-01-24T17:05:35+5:30

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड बुधवारी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय ...

Babasaheb Patil Asurlekar as Kolhapur District President of NCP Ajit Pawar Group | राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ए. वाय. पाटीलांना केलं बाजूला

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची निवड बुधवारी करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. ‘बिद्री’साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून ए. वाय. पाटील नाराज होते, ते पक्षात सक्रीय नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

गेली दहा वर्षे ए. वाय. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पण, गेल्या तीन-चार महिन्यापासून ते पक्षात फारसे सक्रीय नव्हते. त्यामुळे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, शाहूवाडी विधानसभेचे अध्यक्ष संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.

पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असताना जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर वन करु. -बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर 

Web Title: Babasaheb Patil Asurlekar as Kolhapur District President of NCP Ajit Pawar Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.