शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘बाळकडू’ राज्यभर प्रेक्षकांच्या भेटीला

By admin | Updated: January 23, 2015 23:42 IST

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने कार्यकर्त्यांना उद्या, शनिवारी हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ते स्वत:सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर : संजय राऊत प्रस्तुत ‘बाळकडू’ हा बहुचर्चित चित्रपट आज, शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात बाळासाहेबांनी जणू नागरिकांशी संवाद साधला आहे. कोल्हापुरातील शाहू, रॉयल व पार्वती मल्टिप्लेक्स या तीन चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘बाळकडू’ हा चित्रपट म्हणजे मुंबईतील एका सामान्य माणसाची कथा आहे. मुंबईतत्याचा सुरू असलेला संघर्ष व त्याला लाभलेली बाळासाहेबांची प्रेरणा, असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांशी साधलेला संवाद. खासदार संजय राऊत प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वप्ना पाटकर यांची असून, दिग्दर्शन अतुल काळे यांनी केले आहे. यात अभिनेता उमेश कामत, अभिनेत्री नेहा पेंडसे, सुप्रिया फाटक, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, अभय राणे, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत अजित-समीर यांनी दिले आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने कार्यकर्त्यांना उद्या, शनिवारी हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ते स्वत:सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत.