शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या तज्ज्ञ संचालकपदी बाबा देसाई, रामराजे कुपेकर

By admin | Updated: July 31, 2015 01:01 IST

बैठकीत ठराव : सत्यजित पाटील स्वीकृत संचालक

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या स्वीकृत संचालकपदी कसबा बीडचे सत्यजित पाटील, तर तज्ज्ञ संचालकपदी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई व कानडेवाडी (ता. गडहिंग्लज)चे रामराजे कुपेकर यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील ‘गोकुळ’ प्रकल्प येथील प्रधान कार्यालयात संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत संचालक नियुक्तीचे ठराव झाले. गुरुवारच्या बैठकीच्या अजेंड्यावर तज्ज्ञ संचालक व संचालक नियुक्ती हा विषय होता. त्यानुसार दिवंगत संचालक सुरेश पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालकपदाच्या जागेवर त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटील यांना स्वीकृत करण्यात आले. तसेच संचालक मंडळावरील अन्य दोन तज्ज्ञ संचालकपदी पुष्पनगर (ता. भुदरगड, सध्या रा. कळंबा) येथील भाजपचे ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा देसाई व कानडेवाडी येथील रामराजे देसाई-कुपेकर यांची निवड करण्यात आली. सत्यजित पाटील यांचे नाव संचालक रवींद्र आपटे यांनी सुचविले, त्यास संचालक रणजितसिंह पाटील यांनी अनुमोदन दिले. बाबा देसाई यांचे नाव संचालक अरुण डोंगळे यांनी सुचविले, त्यास संचालक पी. डी. धुंदरे यांनी अनुमोदन दिले; तर रामराजे कुपेकर यांचे नाव संचालक अरुण नरके यांनी सुचविले, त्यास संचालक विश्वास जाधव यांनी अनुमोदन दिले. महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांनी संचालक व तज्ज्ञ संचालक पदासाठी नावे निश्चित केल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. स्वीकृत संचालक पदासाठी माजी अध्यक्ष दिलीप पाटील, अ‍ॅड. सुरेश कुराडे व रामराजे कुपेकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. आमदार महादेवराव महाडिक हे हातकणंगले तालुक्याला प्रतिनिधित्व देण्याबाबत आग्रही होते. परंतु, खा. धनंजय महाडिक हे मेहुणे कुपेकर यांच्यासाठी आग्रही राहिले. निवडणुकीवेळी कुपेकर यांना पॅनेलमध्ये घेण्यासाठी खा. महाडिक आग्रही होते. परंतु, त्यावेळची राजकीय समीकरणे पाहता त्यांना पॅनेलमध्ये घेता आले नाही. त्यामुळे स्वीकृत संचालक पदावर तरी त्यांना संधी मिळावी, यासाठी अखेरपर्यंत ते आग्रही राहिले. गुरुवारी सकाळी आ. महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात बैठक होऊन झालेल्या घडामोडीनंतर कुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ‘गडहिंग्लज’ला प्रतिनिधित्व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिवंगत राजकुमार हत्तरगी यांच्या रूपाने गडहिंग्लज तालुक्याला प्रतिनिधित्व होेते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सदानंद हत्तरगी यांना सत्तारूढ गटातून तिकीट मिळाले होते, परंतु त्यांचा पराभव झाल्याने या तालुक्याला प्रतिनिधित्व नव्हते. आता मात्र रामराजे कुपेकर यांच्या रूपाने गडहिंग्लजला प्रतिनिधित्व मिळाले आहे. तसेच कुपेकर यांच्या नियुक्तीने खा. महाडिक यांच्या गटाचाही ‘गोकुळ’मध्ये प्रवेश झाला आहे.(प्रतिनिधी)