शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

बी-टेन्युअरची प्रकरणे प्रांतांकडे जाणार

By admin | Updated: August 6, 2016 00:17 IST

अजित पवार यांची माहिती : ‘लोकमत’चा सातत्याने पाठपुरावा

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बी-टेन्यूअरची ४०० हून अधिक प्रकरणे संबंधित टेबलवरील लिपिकाअभावी रखडली होती. याप्रश्नी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी ही प्रकरणे येत्या दहा दिवसांत प्रांताधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केली जातील, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘इनाम जमिनी’च्या नोंदी किंवा ‘ब’ सत्ता प्रकरणात चुकीचा शेरा मारल्यामुळे मिळकतपत्रावर काहींना बँकांमध्ये कर्जे मिळत नाहीत; तर काहींना आपल्या पाल्यांना परदेशी पाठविण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळत नाही. त्यामुळे या नोंदी योग्य आहेत की नाही, याची निर्गत करण्याचे अधिकार प्रांत किंवा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. जून २०१६ पर्यंत या प्रकरणातील नागरिकांना योग्य ती सेवा या कार्यालयाकडून मिळत होती. मात्र, ४ जून २०१६ रोजी या कार्यालयातील संबंधित टेबलावरील लिपिकाची बदली अन्यत्र करण्यात आली. प्रशासनाने ही बदली या जागेवर त्याला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे केली. बदलीमुळे रिक्त जागी अन्य लिपिक त्या जागी रूजूही झाला. मात्र, त्याला हे काम दिले गेले नाही. विशेष म्हणजे जुन्याच लिपिकासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी हेका धरला आहे; तर ‘या टेबलावर अन्य कुठलाही लिपिकाने काम केले पाहिजे. मी त्या ठिकाणी दुसरा लिपिक देणार नाही,’ असे प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले होते तरीही ही प्रकरणे दोन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित होती. याबाबत ‘लोकमत ने वृत्तही दिले होते. त्याची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी गुरुवारी येत्या दहा दिवसांत सर्व प्रकरणे प्रांताधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केली जातील, असे सांगितले.येत्या दहा दिवसांत बी-टेन्युअरची प्रकरणे प्रांतांकडे हस्तांतरित करू. त्यातून सर्व प्रकरणांची निर्गत केली जाईल. यासंबंधीचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कार्यवाही तत्काळ केली जाईल.- अजित पवार, अप्पर जिल्हाधिकारी बी-टेन्युअरची निर्गत न केल्याने माझ्यासह अनेकांना हे मिळकतपत्र सादर करता येत नाही. त्यामुळे याबाबतची निर्गत त्वरित करावी. या प्रकरणांची निर्गत त्वरित न लागल्यास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे. - सुधीर राणे, नागरिक