सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून आयुष पंडित प्रथम, २३ जणांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:23 IST2024-12-28T12:22:12+5:302024-12-28T12:23:30+5:30

कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात कोल्हापूर विभागात २३ जणांनी बाजी मारत सीए ...

Ayush Pandit topped the CA exam from Kolhapur division, 23 candidates won | सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून आयुष पंडित प्रथम, २३ जणांनी मारली बाजी

सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून आयुष पंडित प्रथम, २३ जणांनी मारली बाजी

कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात कोल्हापूर विभागात २३ जणांनी बाजी मारत सीए होण्याचे स्वप्न साकार केले. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापूरमधून २८२ विद्यार्थी बसले होते. यामधून २३ विद्यार्थी सीए झाले. कोल्हापूर विभागातून आयुष प्रशांत पंडित यांनी प्रथम, तर आशिष दर्शनलाल कारीरा यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

हितेश सुभाष गावित, जयंत नागोजी गोरुले, नम्रता प्रकाश सुर्वे, हिमांशू सुधीर जवळकर, आदित्य अविनाश पेंडुरकर, विरेश मल्लिकार्जुन कोळकी, मोनिश सुरेश, स्वरूप संजय मिरजकर, सिद्धेश सागर मोहोळकर, आकाश विलास कातकर, युगंधरा यशवंत पागे, प्राची तेजमल संघवी, आशना विजय वच्छाणी, शिवांजली भूपतसिंह शिंदे, शिवकुमार विजय कोवाडे, निकिता दीपक पाटील, मोक्षा मनोज शाह, अंकिता सुभाष बेलगुद्री, समृद्धी सरदेसाई आणि प्रणाली गजानन बकरे हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेचे आहेत. या शाखेकडून लायब्ररी, क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते.

जागतिक अर्थकारणात सीएची मोलाची भूमिका आहे. अनेक मुलांचा कल या अभ्यासक्रमाकडे आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेनेही या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या होत्या. त्यांनी याचा लाभ घेत मोठे यश मिळवले. - तस्लीम आरिफ मुल्लाणी, अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कोल्हापूर शाखा.

Web Title: Ayush Pandit topped the CA exam from Kolhapur division, 23 candidates won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.