शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या वाटेवर आयुष्याभराचा अंधार!

By admin | Updated: July 31, 2015 21:27 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : म्हसवेजवळील कातकरी वस्तीवर नाही वीज

संतोष कणसे- शाहूपुरी  -येथून जवळच असणाऱ्या कातकरी वस्तीवर गेल्या पाच वर्षांपासून वीज नाही. त्यामुळे येथील मुलांना अनेक दिव्यातून वाट काढत आपले भविष्य सफल करण्यासाठी धडपडावे लागत आहे. वस्तीच्या रूपातच शिक्षणाच्या वाटेवरच अंधार असल्याने या मुलांचे भवितव्य अधिकच अंधारात गुडूप होत चालले असल्याचे दिसून येत आहे. सातारा शहराजवळील म्हसवे परिसरात कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर असून, मासेमारी हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. येथील रस्त्याच्या बाजूस गेल्या पाच वर्षांपासून काही कुटुंबे आपल्या झोपड्या टाकून राहत आहेत. आपल्या चिमुरड्यांसह त्यांना पावसाळ्याचा व थंडीचा सामना करावा लागत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी या कुटुंबातील महिला व पुरुषांनी फाटक्या कपड्यांचा आधार घेऊन कसेबसे झोपड्या तयार केल्या आहेत. वळणाच्या रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. रात्री सोसाट्याच्या वाऱ्याने झोपडीत राहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडतो. या झोपड्यामध्ये किमान पन्नास ते साठजण राहत आहेत. त्यात काही मुलांचाही समावेश आहे. येथील वीस ते पंचवीस चिमुरडे म्हसवे येथील शाळेत जातात; परंतु या वस्तीवर चारही बाजूने अंधारच अंधार आहे. या वस्तीवर किंवा परिसरात वीज दिसून येत नाही. अनेक मुले दिवे लावून अभ्यास करीत असतात. ही वस्ती नदीच्या जवळ असल्यामुळे सायंकाळी जनावरांचा वावर असतो. त्यामुळेही मुलांचे जीवन धोक्यात आले आहे. आम्ही येथे पाच वर्षांपसून राहत आहे. आमच्या वस्तीवर वीज नसल्याने मुलांना अभ्यासही करता येत नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचे सणसुध्दा करता येत नाहीत. मोबाइल चार्जिंग करायचा म्हटलं तरी आम्हाला दुसऱ्याच्या घरी किंवा दुकानात जावे लागते. आम्हाला वस्तीवर सौरऊर्जा दिवे तरी बसवून द्यावेत. भविष्यात आमची मुलं काहीतरी बनावीत, असे आम्हाला वाटते. - शिवाजी वाघे, रहिवासी